Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • देशभरातील औषध दुकाने बंद; ई-फार्मसी अन् कॉर्पोरेट सवलतींविरोधात संप
Top News

देशभरातील औषध दुकाने बंद; ई-फार्मसी अन् कॉर्पोरेट सवलतींविरोधात संप

Medical Stores Strike Across India
Medical Stores Strike Across India : देशभरातील लाखो औषध विक्रेते (Chemist) यांनी आज, २० मे २०२६ रोजी एकदिवसीय बंद पाळला आहे. ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट’ (AIOCD) आणि ‘महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन’ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत किरकोळ औषध दुकानदारांनी आपली दुकाने बंद (Pharmacies Closed) ठेवली आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये या संपाला पूर्ण प्रतिसाद मिळाला असून, किरकोळ औषध बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झालेली दिसत आहे.
सकाळपासूनच मेडिकल स्टोअर्स बंद असल्याने नेहमी गर्दी असणाऱ्या दुकानांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. संपाचे मुख्य कारणऔषध विक्रेते संघटनांचा मुख्य मुद्दा आहे ऑनलाइन औषध विक्री (E-Pharmacies) चा अनियंत्रित विस्तार. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त सवलतींमुळे किरकोळ दुकानदारांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. याशिवाय बनावट औषधांची विक्री वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे.

काय आहे संघटनांचे म्हणणे

  • डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय ऑनलाइन औषधे घरपोच दिली जात असल्याने अंमली पदार्थ आणि गर्भपाताच्या गोळ्यांचा गैरवापर वाढला आहे.
  • मोठ्या कंपन्या अवाजवी डिस्काउंट देऊन छोट्या दुकानदारांची स्पर्धा मोडीत काढत आहेत.
  • फार्मासिस्ट नसताना औषध विक्री होणे सार्वजनिक आरोग्यासाठी घातक ठरत आहे.

देशातील औषध व्यवसाय अब्जावधी रुपयांची उलाढाल करतो आणि त्यावर लाखो कुटुंबांचा रोजगार अवलंबून आहे. या क्षेत्रातील भांडवलशाही आणि ऑनलाइन कंपन्यांच्या वाढत्या प्रभावामुळे किरकोळ व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत, असे संघटनांचे मत आहे.

विक्रेत्यांच्या मागण्या

  • ई-फार्मसींवर पूर्ण बंदी किंवा कठोर नियंत्रण.
  • कॉर्पोरेट कंपन्यांच्या अवाजवी सवलतींना आळा.
  • औषध विक्रीसाठी पारदर्शक आणि कठोर कायदे.
  • परवाना प्रक्रियेत सुलभता आणि जाचक कारवाई थांबवणे.

राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) ने पूर्वतयारी

रुग्णांच्या गैरसोयीचा विचारसंपामुळे रुग्णांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) ने पूर्वतयारी केली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून, विभागनिहाय विशेष अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. शासकीय आणि खाजगी रुग्णालयांच्या आवारातील इन-हाउस मेडिकल दुकाने तसेच २४ तास चालणारी आपत्कालीन औषध दुकाने या बंदमधून वगळण्यात आली आहेत. अनेक सुजाण नागरिकांनी एक दिवस आधीच आवश्यक औषधांचा साठा केल्याने अद्याप मोठी धावपळ उडालेली नाही.किरकोळ व्यापाऱ्यांनी शांततापूर्ण निदर्शने करत आपल्या मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधले आहे. हा एकदिवसीय संप औषध व्यवसायातील सध्याच्या आव्हानांना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. सरकारकडून यासंबंधी लवकरात लवकर ठोस धोरणात्मक निर्णय अपेक्षित आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts