• Home
  • ताज्या बातम्या
  • Android 17 पासून Gemini AI पर्यंत; Google I/O 2026 मध्ये मोठे खुलासे होणार, लाईव्ह कुठे पाहाल?
Top News

Android 17 पासून Gemini AI पर्यंत; Google I/O 2026 मध्ये मोठे खुलासे होणार, लाईव्ह कुठे पाहाल?

Android 17 Features

Android 17 Features: जगातील सर्वात मोठ्या टेक इव्हेंटपैकी एक असलेला Google I/O 2026 आज रात्री भारतीय वेळेनुसार १० वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील Shoreline Amphitheatre येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, कंपनीकडून AI, Android आणि XR टेक्नोलॉजीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमात गूगल चे सीईओ सुंदर पिचा (CEO Sundar Pichai) दीपमाइंड प्रमुख डेमिस हसबिस (Demis Hassabis) उपस्थित असू शकतात.

हेही वाचा: राहुल नार्वेकर यांच्या सूचनेला धक्का; बेस्ट समितीने बसथांबा स्थलांतर नाकारले; काय आहे नेमकं प्रकरण

Android 17 मध्ये AI फीचर्सवर भर

गुगल काही दिवसांपासून Android 17 संदर्भातील नवीन फीचर्सची माहिती देत आहे. यंदाच्या इव्हेंटमध्ये कंपनी AI आधारित अनेक स्मार्ट फीचर्स सादर करू शकते. विशेषतः प्रीमियम Android स्मार्टफोन्समध्ये नवीन Gemini Intelligence सिस्टम दिली जाऊ शकते. यामुळे:

अ‍ॅप्सचे स्मार्ट ऑटोमेशन
Ai आधारित विजेट्स
अधिक वेगवान टास्क मॅनेजमेंट

यांसारख्या सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

हिंग्लिश समजणारे एआय टूल

गुगल रॅम्बलर नावाचे नवीन डिक्टेशन टूल सादर करू शकते. हे फिचर हिंदी आणि इंग्रजीच्या मिश्र भाषेला म्हणजेच हिंग्लिशला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. याशिवाय Quick Share फीचरमध्येही मोठे बदल अपेक्षित आहेत. Android डिव्हाइसेसमध्ये AirDrop सारखी फास्ट फाइल शेअरिंग सुविधा मिळू शकते.

Gemini AI चे नवीन मॉडेल चर्चेत

Google च्या पुढील पिढीतील Gemini AI मॉडेलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रिपोर्टनुसार हे AI:

टेक्स्ट, ऑडिओ आणि व्हिडिओ एकत्र समजू शकेल
अधिक चांगले reasoning करू शकेल
मोठ्या प्रमाणातील माहिती हाताळू शकेल

यामुळे AI अनुभव अधिक स्मार्ट आणि नैसर्गिक होण्याची शक्यता आहे.

Veo, Lyria आणि Beam वरही अपडेट्स

Google आपल्या AI क्रिएटिव्ह टूल्समध्येही सुधारणा करू शकते.

Veo AI व्हिडिओ जनरेटर
Lyria म्युझिक क्रिएशन टूल
Beam 3D व्हिडिओ कॉलिंग टेक्नोलॉजी

स्मार्ट ग्लासेस आणि XR टेक्नोलॉजीवर फोकस

Google यंदा Android XR प्लॅटफॉर्म आणि AI स्मार्ट ग्लासेसबाबत मोठी घोषणा करू शकते. रिपोर्टनुसार कंपनी Samsung आणि इतर ब्रँड्ससोबत मिळून नवीन स्मार्ट ग्लासेसवर काम करत आहे.

Google I/O 2026 लाईव्ह कुठे पाहाल?

Google I/O 2026 चे थेट प्रक्षेपण Google for Developers YouTube Channel वर पाहता येणार आहे.

मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीद्वारे यूजर्स हा कार्यक्रम लाईव्ह पाहू शकतात.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts