पिंपरी चिंचवड शहरातील दहशतवाद विरोधी पथकाने भोसरी परिसरात कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये अवैध्य वास्तव करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. या महिलेच्या व्हिसाची मुदत संपलेली असताना देखील ती पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास होती. आता तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फातिमा अमजत अथर असे या आरोपी महिलेचे नाव आहे. ती 7 ते 8 वर्षापासून भारतात राहत होती. सध्या ती भोसरी परिसरातील चक्रपानी वसाहत भागांमध्ये राहत होती. या भागात तिला माला विठ्ठल डावखर उर्फ फातिमा बेगम म्हणून ओळखले जाते. भोसरी भागात ती अनेकांच्या घरी घरकाम करत होती. परंतु तिच्या व्हिसाची मुदत संपलेली असताना देखील ती पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्यातील एका तरुणाशी तिचा विवाह झाला असून ती बांगलादेशी असल्याचा तिच्या पतीला देखील माहिती होती. सध्या तिला तिच्या मायदेशी पाठवण्याची तयारी सुरू असून पिंपरी चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने ही कारवाई केली आहे.
काही महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दहशतवाद विरोधी शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईच्या माध्यमातून दहशतवादांशी संबंधित असलेल्या अनेक महिलांवर आणि तरुणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बऱ्याच आयटी इंजिनियर आणि बड्या व्यक्तींचे नावे देखील समोर आली होती.










