Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
गुन्हा

पंचवीस लाखाची सुपारी अन्न खेळ खल्लास; आरोपीस अटक

Food department officials seize betel nut consignment worth ₹25 lakh and arrest accused

प्रतिनिधी/अजय गाढे : छत्रपती संभाजीनगर येथील जालना येथे खुणाच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून दिवसा ढवळ्या खुणाच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान जालना शहरातील अंबड चौफुली येथील कलावती हॉस्पिटल समोर एका 30 वर्षीय तरुणाची गावठी पिस्तुलने फायर करत खून केल्याची घटना समोर आली आहे.

खून केलेल्या तरुणाचा मृतदेह एका कार मध्ये आढळून आला होता. हा मृत तरुण जालना येथील तुळजाभवानी नगर येथील रहिवासी होता. त्याचे नाव सागर श्रीराम धानुरे असे होते. याप्रकरणी सागर धानोरे याचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आला होता.यादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा : फसवणूक, मानसिक छळामूळे शेतकऱ्याची आत्महत्या; मुलाने केली पोलीसात तक्रार दाखल

कल्याण गणपतराव भोजने याचे मयत सागर धानोरे सोबत पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद होते.त्यामुळे कल्याण भोजने याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने कबूल केले की, मयत सागर याला मारण्यासाठी कमलेश झाडीवाले याला पंचवीस लाख रुपयाची सुपारी देण्याचे कबूल केले होते व दोघांनी मिळून सागर याला जीवे मारण्याचा कट रचला होता. (Betel Nut Smuggling Busted)

त्यानुसार आरोपी कल्याण भोजने याने मयत सागर धानोरे याला कलावती हॉस्पिटल समोर कार मध्ये भेटण्यासाठी बोलावून घेत याच कार मध्ये कमलेश झाडीवाले याला बोलावून घेत,बोलण्यामध्ये व्यस्त करत मयत सागर धानोरे याच्यावर गावठी पिस्तुलने ने फायर करत चाकूने छातीत व गळ्यावर वार करून ठार केले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना 24 तासात जेरबंद केले आहे. याप्रकरणी पुढील तपास कदीम जालना पोलीस करत असल्याची माहिती समोर आली आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts