Bhopal Sisters Conversion Racket Case | भोपाळमध्ये (Bhopal) एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. दोन बहिणी ज्या स्वत: स्त्रिया असून देखील त्यांनी असं कृत्य केलं ज्यामुळे महिलांवरही विश्वास ठेवायचा का? असा प्रश्न उभा राहिला आहे. आफरीन (Aafreen) आणि अमरीन (Amreen) या दोन बहिणींनी देहव्यापार (Sex Racket) करत जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता त्यांचा या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी या दोन्ही बहिणींना अटक केली आहे. तर या रॅकेटमधील इतर तिघेजण अद्याप फरार आहेत.
हेही वाचा – पिंपळनेर तिहेरी हत्याकांड; पीडित कुटुंबांना मदत व नोकरीसाठी साक्रीत हजारोंचा मोर्चा
नेमकं प्रकरण काय?
छत्तीसगडमधील 21 वर्षीय आणि भोपाळमधील 30 वर्षीय महिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला. तर झालं असं की, सगळ्यात आधी परिस्थितीने गरीब असलेल्या म्हणजेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तरूण मुलींसोबत मैत्री करायची. नंतर त्या मुलींना नोकरीचं आमिष दाखवायचं आणि त्यांना विश्वासात घ्यायचं. त्यानंतर त्या मुलींना आपल्यासोबत घेऊन जायचं आणि त्यांचं लैंगिक शोषण करायचं, असा या टोळीचा प्लॅन होता.
तर हा धक्कादायक प्रकार नोव्हेंबर 2025 मध्ये सुरू झाला. आरोपी अमरीनसोबत रूम शेअर करणाऱ्या 21 वर्षीय ब्युटीशियनसोबत (Beautician) हा प्रकार घडला असून तिनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिनं दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, नोव्हेंबर महिन्यात अमरीन आपल्याला तिच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भोपाळमधील अब्बास नगरमध्ये घेऊन गेली होती. तिथे अमरीनचा भाऊ बिलाल यानं तिच्या चहामध्ये अंमली पदार्थ (Drugs) मिसळले होते. ज्यामुळे ती बेशुद्ध पडली अन् तिच्यावर बलात्कार (Rape) करण्यात आला, असा धक्कादायक खुलासा ब्युटीशियनने केला आहे.
नंतर पुढच्या महिन्यात अमरीनने तिला काही वैयक्तिक कामाच्या बहाण्याने अहमदाबादला घेऊन गेली होती. तिथे गेल्यानंतर तिची ओळख यासिर नावाच्या एका तरूणासोबत झाली. त्यानेही तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. सोबतच अमरीनचा सहकारी चंदन यादवनेही ऑगस्ट 2025 ते जानेवारी 2026 या काळात तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ब्युटीशियनने केला आहे.
छोटे कपडे घालत लैंगिक अत्याचार अन् बुरखा घालून धर्मांतर करण्याचा प्रयत्न
जेव्हा पीडित ब्युटीशियनने प्रतिकार करण्यास सुरूवात केली तेव्हा तिला तिचे आक्षेपार्ह स्थितीत काढलेले तिचे फोटो दाखवत तिला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. त्यानंतर पीडितेला छोटे कपडे घालण्यास जबरदस्तीने भाग पाडत श्रीमंत पुरूषांसोबत संवाद साधण्यासाठी पबमध्ये नेण्यात आलं होतं. तिथे देखील तिला अंमली पदार्थ देत तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार करण्यात आले. यादरम्यान तिला धर्मांतर (Love Jihad) करण्यासाठी देखील दबाव टाकण्यात आला आणि बुरखा घालण्यासही भाग पाडण्यात आले होते. असाच प्रकार ब्युटीशियन सोबत अमरीनकडे घरकाम करणाऱ्या एका महिलेसोबतही घडला होता. या महिलेने देखील अशीच तक्रार दाखल केली होती. बिलाल, चंदन आणि यासिर या तिघांनी मिळून तिला ड्रग्ज देत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता, असा आरोप महिलेने केला होता.
दरम्यान, पीडित ब्युटीशियन जानेवारी महिन्यात पळून जाण्यात यशस्वी ठरली आणि ती तिच्या मामाकडे छत्तीसगडला गेली. त्यानंतर ती फेब्रुवारीमध्ये भोपाळला परतली आणि तिने 22 फेब्रुवारी या दिवशी बागसेवानिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी दोन्ही बहिणींविरूद्ध आणि तिन्ही पुरूषांवर बलात्कार, जबरदस्तीने धर्मांतर आणि गुन्हेगारी कट रचणे यासारख्या संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे.












