Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पावसात मदतीसाठी बस थांबवली, पण पुढे १६ वर्षीय मुलीसोबत घडलं भयंकर…नेमकं प्रकरण काय?
गुन्हा

पावसात मदतीसाठी बस थांबवली, पण पुढे १६ वर्षीय मुलीसोबत घडलं भयंकर…नेमकं प्रकरण काय?

Delhi Bus Rape Case
25
Delhi Bus Rape Case: दिल्लीतील या धक्कादायक घटनेने २०१२ मधील निर्भया प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. मुसळधार पावसात मदतीसाठी बसमध्ये चढलेल्या १६ वर्षीय मुलीसोबत धावत्या बसमध्ये अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दिल्लीत (Delhi Crime) २०१२ मध्ये घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या (Delhi Bus Rape Case) आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. ४ ऑगस्ट रोजी दिल्लीत धावत्या स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय मुलीवर अत्याचार (16-Year-Old Girl Rape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती दिल्ली पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी सार्वजनिक केली. या प्रकरणी बस चालक आणि वाहकाला अटक करण्यात आली असून, बसही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील इयत्ता अकरावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. घरात किरकोळ वादांनंतर तिने कोणालाही न सांगता रात्री घर सोडले होते. ग्रेटर नोएडामध्ये राहणाऱ्या चुलत भावाला भेटण्यासाठी ती निघाली होती.

मात्र, प्रवासादरम्यान मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ती ग्रेटर नोएडातील परी चौक परिसरात उतरली. त्यावेळी रस्त्यावरून एक रिकामी स्लीपर बस जात होती. पावसापासून बचाव करण्यासाठी तसेच पुढील प्रवासासाठी मदत मिळावी या उद्देशाने तिने बस थांबवण्यासाठी हात केला. यावेळी बस चालक कुलदीप आणि वाहक संदीप यांनी बस थांबवून तिला आत घेतले. बस नोएडा सेक्टर-६३च्या दिशेने जात असल्याचे त्यांनी मुलीला सांगितले.

हेही वाचा: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार म्हणजे नेमकं काय? शिक्षकांची निवड कशी होते आणि कोणत्या निकषांवर मिळतो सन्मान?

बस सुरू होताच गैरवर्तनाला सुरुवात

पोलिसांच्या नोंदीनुसार, बस काही अंतर पुढे गेल्यानंतर वाहकाने मुलीसोबत अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. पीडितेने केलेल्या आरोपांनुसार, त्यानंतर दोन्ही आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला. तिने विरोध केल्यानंतर आरोपींनी तिला गंभीर परिणामांची धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

मध्यरात्रीच्या सुमारास आरोपींनी मुलीला काश्मिरी गेट बस टर्मिनसजवळील रिंग रोड परिसरात उतरवले आणि तेथून निघून गेले. त्यानंतर पीडितेने त्याच रात्री काश्मिरी गेट पोलिसांशी संपर्क साधला. ( Delhi rape case latest update)

तिमारपूरमधून दोन्ही आरोपी अटकेत

तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान दोन्ही आरोपी तिमारपूर परिसरातील बस पार्किंगमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर चालक कुलदीप आणि वाहक संदीप यांना अटक करण्यात आली.

या प्रकरणातील स्लीपर बसही पोलिसांनी ताब्यात घेतली असून, तिची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. (latest Delhi news)

४७ किमीच्या प्रवासात काय घडलं?

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे आरोपी ही बस नोएडातील सुरजपूर येथील वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी घेऊन गेले होते. बसची दुरुस्ती झाल्यानंतर ती रिकामी तिमारपूरच्या दिशेने नेली जात होती. याच प्रवासादरम्यान परी चौक परिसरात पीडित मुलीने बस थांबवण्याचा प्रयत्न केला आणि आरोपींनी तिला बसमध्ये घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, बसने परी चौक ते दिल्लीपर्यंत सुमारे ४७ किलोमीटरचा प्रवास केला. बसच्या खिडक्यांना पडदे लावलेले असल्यामुळे बाहेरून आतमध्ये काय सुरू आहे, हे सहज दिसत नव्हते. या प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलिसांकडून सुरू असून, फॉरेन्सिक अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts