Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • यशच्या ‘टॉक्सिक’ला वीकेंडचा फटका; २०० कोटींचा टप्पा पार करूनही कमाई थंडावली
मनोरंजन

यशच्या ‘टॉक्सिक’ला वीकेंडचा फटका; २०० कोटींचा टप्पा पार करूनही कमाई थंडावली

Toxic box office collection
22
Toxic box office collection: यशच्या ‘टॉक्सिक’ने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला असला, तरी वीकेंडला चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. रविवारी कलेक्शनमध्ये झालेल्या घसरणीमुळे आता चिपत्रपटाच्या पुढील कमाईकडे सर्वांचे आहे.

यशाच्या बहुप्रतीक्षित टॉक्सिक’ चिपत्रपटाने प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली. पहिल्याच दिवशी शंभर कोटींचा आकडा पार करणाऱ्या या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर २०० कोटींची कमाईही (Toxic box office collection) ओलांडली. मात्र, सुरुवातीच्या जबरदस्त प्रतिसादानंतर चित्रपटाच्या कमाईचा वेग काहीसा कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

रविवारचा दिवस चित्रपटासाठी अपेक्षेइतका चांगला ठरला नाही. उपलब्ध बॉक्स आणि आकडेवारीनुसार, पाचव्या दिवशी ‘टॉक्सिक’ने भारतात सुमारे २३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्याआधी शनिवारी चित्रपटाने २५. १५ कोटी रुपये कमावले होते. त्यामुळे एका दिवसात कमाईत घट झाली आहे.

हेही वाचा: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार म्हणजे नेमकं काय? शिक्षकांची निवड कशी होते आणि कोणत्या निकषांवर मिळतो सन्मान?

रविवारी चित्रपटाचे देशभरात हजारो शो आयोजित करण्यात आले होते. मात्र, त्यातील सरासरी प्रेक्षक उपस्थिती तुलनेने कमी राहिली. त्यामुळे चित्रपटाची कमाई वाढण्याऐवजी स्थिरावल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी मिळालेल्या मोठ्या ओपनींगनंतर पुढील दिवसांमध्ये कमाईत सातत्याने घट होताना दिसत आहे. (Toxic India box office)

भाषेनुसार पाहिल्यास हिंदी आवृत्तीने रविवारी सर्वाधिक कमाई केली. हिंदीतून सुमारे १४.५० कोटी रुपये, कन्नडमधून ६.४० कोटी रुपये, तेलुगूमधून १.४० कोटी रुपये, तामीळमधून ६० लाख रुपये आणि मल्याळममधून सुमारे १० लाख रुपयांचा व्यवसाय झाल्याचे सांगितले जात आहे.  (Toxic latest box office collection)

जागतिक स्तरावर मात्र चित्रपटाची कामगिरी तुलनेने चांगली आहे. ‘टॉक्सिक’ने जगभरात २८५ कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचा दावा करण्यात आला आहे. परदेशातील बाजारपेठेतही चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.

‘टॉक्सिक’मध्ये यशसोबत नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत आणि हुमा कुरेशी यांच्या भूमिका आहेत. गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता आगामी दिवसांमध्ये चित्रपटाची कमाई पुन्हा वेग घेते की घट कायम राहते, याकडे बॉक्स ऑफिसचे लक्ष लागले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts