Breaking News :
  • Home
  • Top News
  • आकाशात उंच भरारी घ्यायचीये? भारतातील हे पॅराग्लायडिंग स्पॉट्स करा बुकमार्क!
लाईफस्टाईल

आकाशात उंच भरारी घ्यायचीये? भारतातील हे पॅराग्लायडिंग स्पॉट्स करा बुकमार्क!

India Paragliding Spots
29
India Paragliding Spots: तुम्हाला निसर्गाचा अनोखा अनुभव घ्यायला नेहमीच आवडत असेल, तर पॅराग्लायडिंग हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊयात भारतातील कोणते पॅराग्लायडिंग ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहेत.

सुट्टीत नेहमीच्या पर्यटनस्थळांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा विचार करत असाल, तर पॅराग्लायडिंगचा थरार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. डोंगररांगा, हिरवीगार दऱ्या आणि निसर्गाचं विहंगम दृश्य डोळ्यांसमोर ठेवून आकाशात उड्डाण करण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो.

पॅराग्लायडिंगसाठी भारतातील अनेक सुंदर ठिकाणं आहेत. विशेष म्हणजे, या साहसी खेळाचा पहिल्यांदाच अनुभव घेणाऱ्यांसाठीही टँडम फ्लाइटची सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध असते. प्रशिक्षित पायलटसोबत उड्डाण केल्यामुळे नवख्या पर्यटकांनाही आकाशातून निसर्ग पाहण्याचा आनंद घेता येतो. चला, भारतातील काही लोकप्रिय पॅराग्लायडिंग डेस्टिनेशनवर नजर टाकूया.

हेही वाचा: पावसात मदतीसाठी बस थांबवली, पण पुढे १६ वर्षीय मुलीसोबत घडलं भयंकर…नेमकं प्रकरण काय?

कामशेत, महाराष्ट्र

पुण्याजवळील कामशेत हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पॅराग्लायडिंग डेस्टिनेशन आहे. डोंगर आणि हिरवाईने वेढलेल्या या परिसरात टँडम फ्लाइटसह पॅराग्लायडिंगचा अनुभव घेता येतो. टॉवर हिलसह परिसरातील विविध टेक-ऑफ पॉइंट्स साहसी पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. ( LS Marathi News Channel )

सोलंग व्हॅली

मनालीजवळील सोलंग व्हॅली आपल्या निसर्गसौंदर्यासोबतच साहसी खेळांसाठीही प्रसिद्ध आहे. बर्फाच्छादित पर्वत आणि विस्तीर्ण दऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पॅराग्लायडिंग करण्याचा अनुभव पर्यटकांसाठी खास ठरतो.

गंगटोक, सिक्कीम

ईशान्य भारतात पॅराग्लायडिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर गंगटोक हा आकर्षक पर्याय आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांचं विहंगम दृश्य आणि थंड हवामान यामुळे येथील फ्लाइटचा अनुभव वेगळाच ठरतो. आकाशातून सिक्कीमच्या निसर्गाचं सौंदर्य पाहण्याची संधी साहसप्रेमींना मिळते.

भीमताल आणि नौकुचियाताल, उत्तराखंड

उत्तराखंडातील नैनीताल परिसरातही पॅराग्लायडिंगचा आनंद घेता येतो. विशेषतः भीमताल आणि नौकुचियाताल येथून आकाशात झेप घेताना तलाव, हिरव्या टेकड्या आणि आजूबाजूचा निसर्ग वरून पाहण्याची संधी मिळते.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts