Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • भोरमध्ये अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची मोठी कारवाई; गुन्हा दाखल
गुन्हा

भोरमध्ये अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची मोठी कारवाई; गुन्हा दाखल

Forest officials seize illegally transported timber during raid in Bhor

Illegal timber transport action in Bhor : पुण्यातील भोर तालुक्यात जळावू लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर वनविभागाने धडक कारवाई करत ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. रामबाग येथील चौकामध्ये सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत ट्रकसह मोठ्या प्रमाणात जळावू लाकूड जप्त करण्यात आले आहे.

भोर वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती शितल राठोड यांना भोर–शिरवळ मार्गावरून विनापरवाना जळावू लाकडाची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार रामबाग चौकात सापळा रचण्यात आला. रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास संशयित ट्रक तपासणीसाठी थांबवण्यात आला असता, ट्रकमध्ये विनापरवाना वृक्षतोड करून आणलेले जळावू लाकूड भरले असल्याचे आढळून आले.

हे ही वाचा : दौंडजवळ गोवंश कत्तलीचा प्रयत्न हाणून पाडला; २४ गोवंशाची सुटका, चौघांवर गुन्हा दाखल

गुन्हा दाखल

या प्रकरणी संतोष शेडगे (रा. भोरेश्वर नगर, भोर) या संशयित ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर वन संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित ट्रक व त्यातील जळावू लाकूड वनविभागाने जप्त केले आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक भोर शितल राठोड यांच्या सूचनेनुसार वनरक्षक के. एम. हिमोणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असल्याच्या तक्रारी

भोर तालुक्यात काही ठिकाणी अद्यापही बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. अशा ठिकाणीही वनविभागाने लक्ष देत कठोर कारवाई करावी, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि वनसंपत्तीचे संरक्षण होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अवैध लाकूड वाहतुकीवर आळा घालण्यासाठी वनविभागाने केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे वनसंपत्तीचे रक्षण होईल, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts