Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • किडनी रॅकेटचे भारतातील कनेक्शन उघड! चंद्रपूर पोलिसांना मोठे यश
Top News

किडनी रॅकेटचे भारतातील कनेक्शन उघड! चंद्रपूर पोलिसांना मोठे यश

Chandrapur police investigating kidney racket case

Kidney racket India link Chandrapur police : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील रोशन कुडे या शेतकऱ्याने सावकारी कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याचे प्रकरण आता एका मोठ्या आंतरराष्ट्रीय घोटाळ्याकडे वळले आहे. सुरुवातीला केवळ कंबोडिया कनेक्शन वाटणाऱ्या या गुन्ह्यात आता भारतातील नामांकित हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांची साखळी उघड झाली आहे.

चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणी क्रिष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू आणि हिमांशु भारद्वाज यांना अटक केली. त्यांच्या तांत्रिक विश्लेषणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी हिमांशु भारद्वाज याने स्वतःची किडनी देखील याच रॅकेटमार्फत विकली होती.

हे ही वाचा : भोरमध्ये अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची मोठी कारवाई; गुन्हा दाखल

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) एक पथक सध्या तामिळनाडूच्या स्टॉर किम्स हॉस्पिटलमध्ये संचालक डॉ. राजरत्नम यांच्या शोधात आहे. तर दुसऱ्या पथकाने दिल्लीतून डॉ. रविंद्रपाल सिंग यांना ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने डॉ. सिंग यांना २ जानेवारी २०२६ रोजी चंद्रपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

एका गरीब शेतकऱ्याच्या तक्रारीवरून सुरू झालेला हा तपास आता देशातील मोठ्या किडनी प्रत्यारोपण घोटाळ्याचा पर्दाफाश करत आहे. यात आणखी किती मोठी नावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts