Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • मावळमध्ये हुक्कासाठी लाखणाऱ्या तंबाखुजन्य पदार्थावर मोठी कारवाई तब्बल 31 कोटीचा प्रतिबंधित साठा जप्त
गुन्हा

मावळमध्ये हुक्कासाठी लाखणाऱ्या तंबाखुजन्य पदार्थावर मोठी कारवाई तब्बल 31 कोटीचा प्रतिबंधित साठा जप्त

Banned hookah tobacco stock worth Rs 31 crore seized in Maval

Maval hookah tobacco seizure : मावळ तालुक्यात अन्न व औषध प्रशासन आणि अन्न सुरक्षा विभागाने मोठी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित हुक्का तंबाखूचा साठा जप्त केला आहे. मावळ तालुक्यातिल टाकवे येथे मे. सोएक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या गोडाऊनवर छापा टाकून एकूण 548.488 किलो हुक्का तंबाखू जप्त करण्यात आला आहे. या साठ्याची एकूण किंमत तब्बल 31 कोटी 67 लाख इतकी आहे.

काय आहे प्रकरण

या कारवाईत अफजल अंथेटिक फ्लेवर्ड हुक्का आणि सोएक्स अंथेटीक हर्बल हुक्का या प्रकारांचे तयार माल आणि कच्या माल असे विविध फ्लेवर्सचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला असून सदर उत्पादने सार्वजनिक आरोग्यास धोकादायक असल्याने संबंधित गोडाऊन मालाचा साठा सिल करण्यात आले असून, विक्री आणि साठवणूक तात्काळ बंद करण्यात आले आहे.

हे ही वाचा : सरपंच ओझरडे सह दोघांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

अधिक तपास सुरू

या प्रकरणी कंपनीचा सहाय्यक व्यवस्थापक अनिल कुमार चव्हाण याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून फैजल फजलानी आसीफ फजलानी तसेच सोएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सोएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड निर्मल अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  घटनेचा अधिक तपास वडगाव पोलिस करत आहेत.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts