Satara doctor suicide police harassment: सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एक घटना समोर आली आहे. या गावात एका डॉक्टर महिलेने हातावर पेनाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या सूसाईड नोट मध्ये महिलेने पोलीस निरीक्षकाने तिच्यावर बलात्कार केल्याचा खळबळजनक दावा केला. या घटनेमुळे सातारा परिसरात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय येथील महिला डॉक्टरने सूसाईड केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने सूसाईड करण्यापूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली. या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने वारंवार अत्याचार आणि बलात्कार केल्याचे नमूद आहे. पोलीस निरीक्षक बदने याने तब्बल चार वेळा बलात्कार केला असून पोलीस प्रशांत बनकर यानेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे. काही महिन्यांपासून मृत महिला डॉक्टर पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्याची माहिती समोर आली आहे.
हे हि वाचा : बिहारमधील चार मोस्ट वॉन्टेड गुंडांचा दिल्लीत एन्काऊंटर; दिल्ली-बिहार पोलिसांची संयुक्त कामगिरी
ही महिला डॉक्टर बऱ्याच महिन्यापासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकली होती. वैद्यकीय तपासणीसंदर्भात त्यांचा पोलिसांशी वाद झाला होता. त्यानंतर या महिलेची अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान डॉक्टर महिलेने वरिष्ठांकडे माझ्यावर अन्याय होत असून मी आत्महत्या करेल अशा आशयाची लिखित तक्रार केली होती. परंतु या तक्रारीवर वरिष्ठांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप तिच्या सहकाऱ्यांकडून केला जात आहे.
राज्य महिला आयोगाने घेतली दखल
आता या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे. संपूर्ण घटनेचा तपास सुरु असून डॉक्टर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला असून या प्रकरणातील आरोपीची गय केली जाणार नाही, अशा घटना समाजात घडू नये यासाठीच पोलीस कार्यरत असतात. पण रक्षा करणाराच कोणाच्या हत्येला कारणीभूत असेल तर, हे दुर्दैवी असल्याचे वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरणकर यांनी केलं आहे.












