Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पितृपक्षात यंदा तिथींचा विशेष योग! ३० सप्टेंबरला चतुर्थी-पंचमीचे श्राद्ध, जाणून घ्या नेमकं कारण
संस्कृती

पितृपक्षात यंदा तिथींचा विशेष योग! ३० सप्टेंबरला चतुर्थी-पंचमीचे श्राद्ध, जाणून घ्या नेमकं कारण

Pitru Paksha 2026
37
Pitru Paksha 2026: यंदा ३० सप्टेंबरला चतुर्थी आणि पंचमी या दोन्ही तिथींचे श्राद्ध केले जाणार आहे. पंचमीचे श्राद्ध १ ऑक्टोबरला का नाही? जाणून घ्या तिथी आणि अपराह्न काळाचे गणित.

पितृपक्ष (Pitru Paksha) हा आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्याचा महत्त्वाचा काळ मानला जातो. यंदाच्या पितृपक्षात मात्र तिथींच्या वेळेमध्ये झालेल्या बदलामुळे श्राद्धाच्या तारखांबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, ३० सप्टेंबर २०२६ रोजी चतुर्थी आणि पंचमी (Chaturthi Panchami Shraddha) या दोन्ही तिथींचे श्राद्ध एकाच दिवशी केले जाणार आहे. त्यामुळे पंचमीचे श्राद्ध १ ऑक्टोबरला न करता ३० सप्टेंबरलाच का केले जाते, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. यामागे तिथी आणि अपराह्न काळाचे गणित महत्त्वाचे आहे.

हेही वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांचे आजचे वंशज कोण? शाहू महाराज ते उदयनराजे; सातारा-कोल्हापूरचा इतिहास आणि कोट्यवधींची संपत्ती

३० सप्टेंबरला चतुर्थीचे श्राद्ध का?

चतुर्थी तिथी २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ९ मिनिटांनी सुरू होऊन ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ५५ मिनिटांपर्यंत राहणार आहे.

श्राद्धासाठी दिवसातील ( Chaturthi Shraddha)  अपराह्न काळ विशेष महत्त्वाचा मानला जातो. ३० सप्टेंबरला हा काळ साधारण दुपारी १ वाजून २२ मिनिटांपासून ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत आहे. या कालावधीत चतुर्थी तिथी उपस्थित असल्याने चतुर्थीचे श्राद्ध ३० सप्टेंबर रोजीच केले जाईल.

मग पंचमीचे श्राद्धही ३० सप्टेंबरलाच का?

चतुर्थी संपल्यानंतर ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी पंचमी तिथी सुरू होते. महत्त्वाची बाब म्हणजे त्या वेळी अपराह्न काळ अद्याप संपलेला नसतो. अपराह्न काळ दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत असल्याने पंचमी तिथीलाही या काळाचा काही भाग मिळतो. यामुळे पंचमीचे श्राद्धदेखील ३० सप्टेंबर रोजीच करण्याचे गणित लागू होते.

१ ऑक्टोबरला पंचमीचे श्राद्ध का नाही?

पंचमी तिथी १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत राहणार आहे. मात्र, त्या दिवशी श्राद्धासाठी महत्त्वाचा अपराह्न काळ सुरू होण्यापूर्वीच पंचमी तिथी समाप्त झालेली असेल. त्यामुळे पंचमीचे श्राद्ध १ ऑक्टोबरला न करता ३० सप्टेंबरलाच केले जाते.

श्राद्धाची तारीख ठरवताना हे लक्षात ठेवा

पितृपक्षातील श्राद्धाची तारीख ठरवताना केवळ सूर्योदयाच्या वेळी कोणती तिथी आहे, एवढेच पाहिले जात नाही. त्या दिवशी श्राद्धासाठी महत्त्वाच्या अपराह्न काळात संबंधित तिथी आहे का, हे देखील पाहिले जाते. यंदा चतुर्थी आणि पंचमीच्या तिथींच्या वेळेमध्ये अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे दोन्ही तिथींचे श्राद्ध एकाच दिवशी येत आहे.

मात्र, श्राद्धाची अचूक वेळ आणि तिथीचे गणित स्थानिक पंचांग, सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ आणि स्थानानुसार बदलू शकते. त्यामुळे आपल्या शहरातील पंचांगानुसार श्राद्धाची वेळ निश्चित करणे योग्य ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts