Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • Top News
  • बाजारात सोन्या-चांदीचा धमाका! किती वाढले दर? जाणून घ्या प्रमुख शहरांतील आजचे अपडेटेड भाव
ताज्या बातम्या

बाजारात सोन्या-चांदीचा धमाका! किती वाढले दर? जाणून घ्या प्रमुख शहरांतील आजचे अपडेटेड भाव

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत असलेल्या सोने आणि चांदीच्या दरांनी अखेर उसळी घेतली आहे. आज दिल्ली, मुंबई, चेन्नईसह प्रमुख शहरांतील अपडेटेड भाव जाणून घ्या.

गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण नोंदवत असलेल्या सोन्या- चांदीच्या दरांनी आज पुन्हा जोरदार वाढ दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि विशेषतः अमेरिकेत जाहीर झालेली कमकुवत रोजगार आकडेवारी यामुळे डॉलरवर दबाव आला असून त्याचा सकारात्मक परिणाम मौल्यवान धांतूंवर दिसून आला आहे.

आज सोन्याच्या दरात सुमारे १३७१ रुपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट सोनं १, ४३,००० प्रति १० ग्रॅम या पातळीवर पोहोचले आहे. त्याचबरोबर चांदीनेही मोठी झेप घेत ३,४०० प्रति किलो वाढीसह २,२९,००० प्रति किलो असा दर गाठला आहे.

हेही वाचा: VB-G RAM G योजना लागू; कोणाला मिळणार थेट फायदा? जाणून घ्या सविस्तर

आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी कायम

जागतिक बाजारातही सोन्या- चांदीमध्ये मजबूती दिसत आहे. सकाळच्या सत्रात सोन्याचा दर ४, १९८.५० डॉलर प्रति औंस इतका नोंदवला गेला. तर चांदी पुन्हा वाढून 62.560 डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत आहे.

दर वाढीमागची कारणे काय?

सोन्या-चांदीच्या किमतींवर अनेक आंतरराष्ट्रीय घटक परिणाम करतात. त्यामध्ये अमेरिकेतील व्याजदर धोरण, डॉलरची ताकद, जागतिक राजकीय तणाव आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी यांचा समावेश होतो. यावेळी अमेरिकेतील रोजगार आकडेवारी कमजोर आल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळण घेतले आहे.

जूनमध्ये मोठी घसरण, आता पुन्हा सुधारणा

जून महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्या काळात सोनं सुमारे 13,000 रुपये आणि चांदी 30,000 रुपये पेक्षा जास्त खाली आली होती. मात्र आता बाजारात पुन्हा तेजी दिसत असून ही वाढ किती काळ टिकेल याबाबत अनिश्चितता कायम आहे.

देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

मुंबई

24 कॅरेट : 14,379 रु प्रति ग्रॅम
22 कॅरेट : 13,181 रु प्रति ग्रॅम
18 कॅरेट : 10,785 रु प्रति ग्रॅम

दिल्ली

24 कॅरेट : 14,394 रु प्रति ग्रॅम
22 कॅरेट : 13,196 रु प्रति ग्रॅम
18 कॅरेट : 10,800 रु प्रति ग्रॅम

चेन्नई

24 कॅरेट : 14,619 रु प्रति ग्रॅम
22 कॅरेट : 13,401 रु प्रति ग्रॅम
18 कॅरेट : 11,161 रु प्रति ग्रॅम

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts