• Home
  • राशी भविष्य
  • संस्कृती
  • गुरु ग्रह होणार अस्त! 14 जुलैपासून ‘या’ 4 राशींच्या जीवनात येऊ शकतात मोठे बदल; जाणून घ्या नेमका प्रभाव
राशी भविष्य

गुरु ग्रह होणार अस्त! 14 जुलैपासून ‘या’ 4 राशींच्या जीवनात येऊ शकतात मोठे बदल; जाणून घ्या नेमका प्रभाव

Jupiter Combust 2026

Jupiter Combust 2026: यंदा १४ जुलैपासून गुरु ग्रह अस्त होणार असून, ज्योतिषीय मान्यतेनुसार अनेक राशींच्या जीवनात मोठे बदल घडू शकतात. या काळात कोणत्या राशींवर काय परिणाम होणार, जाणून घ्या

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीमध्ये होणारे बदल जीवनावर परिणाम घडवतात, असे मानले जाते. २०२६ मध्ये सूर्य कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर गुरू ग्रह अस्त होणार आहे. साधारणपणे १४ जुलै २०२६ पासून ऑगेस्टच्या सुरुवातीपर्यंत हा कालावधी राहण्याची शक्यता आहे. (Jupiter Combust 2026)

ज्योतिषीय मान्यतेनुसार गुरू अस्ताच्या काळात विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात यांसारखी शुभ कार्ये टाळण्याचा सल्ला दिला जातो. या काळात काही राशींच्या व्यक्तींनी आर्थिक निर्णय, करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत अधिक सावध राहावे, असे ज्योतिष अभ्यासक सांगतात. Latest Horoscope News 2026

वृषभ राशी

वृषभ राशीसाठी गुरु ग्रह काही महत्त्वाच्या भावांचा स्वामी मानला जातो. गुरु अस्ताच्या काळात आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे सांगितले जाते. गुंतवणूक करताना घाईचे निर्णय टाळावेत. तसेच पचनसंस्थेशी संबंधित आरोग्याच्या समस्या जाणवण्याची शक्यता असल्याने आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

तूळ राशी

तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सहकारी किंवा वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता असल्याचे ज्योतिषीय अंदाज सांगतात. आर्थिक बाबतीत कर्ज किंवा इतर जबाबदाऱ्यांमुळे तणाव वाढू शकतो.

मकर राशी

मकर राशीच्या व्यक्तींनी गुरु अस्ताच्या काळात अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे, असा सल्ला दिला जातो. अचानक येणाऱ्या आर्थिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. तसेच प्रवास किंवा कौटुंबिक संबंधांमध्ये काही आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे.

धनु आणि मीन राशी

धनु आणि मीन राशींचा स्वामी गुरु ग्रह असल्याने या राशींवर गुरु अस्ताचा प्रभाव अधिक जाणवू शकतो, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. या काळात आत्मविश्वास कमी होणे, निर्णय घेताना संभ्रम निर्माण होणे किंवा कामांमध्ये विलंब होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.

गुरु अस्ताच्या काळात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी आध्यत्मिक उपाय, गुरु ग्रहाशी संबंधित पूजा-अर्चना किंवा ज्योतिषीय मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला जातो. तर काही व्यक्ती पुष्कराजासारखी रत्ने धारण करतात किंवा गुरु शांतीचे उपाय करतात, मात्र असे उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

(टीप: वरील माहिती वैदिक ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. याला वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.)

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts