IUAC Recruitment 2026: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारी संस्थेत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीबाबतची सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया.
जर तुम्हाला खरोखरच केंद्र सरकारच्या संस्थेत नोकरी करायची असेल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. कारण आता शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) एक स्वायत्त संस्था, इंटर- युनिव्हर्सिटी ॲक्सिलरेटर सेंटरने (IUAC), नवी दिल्ली, यांनी वैज्ञानिक, कनिष्ठ अभियंता (JE) आणि ग्रंथालय सहाय्यक यांसारख्या विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भारतीअंतर्गत एकूण ८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ४ ऑगस्ट २०२६ पर्यंत ओंलीनपद्धतीने अर्ज करू शकतात. चला तर जाणून घेऊयात या भरतीबाबत अधिक सविस्तर माहिती.
कोणत्या पदांसाठी भरती होणार?
वैज्ञानिक-सी (Scientist-C) – 5 जागा
ज्युनियर इंजिनिअर-सी (Junior Engineer-C) – 2 जागा
लायब्ररी असिस्टंट-सी (Library Assistant-C) – 1 जागा
शैक्षणिक पात्रता आणि अटी
यात प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.
वैज्ञानिक-सी
उमेदवाराकडे फिजिक्स किंवा अप्लाइड फिजिक्समध्ये एमएससी पदवी असणे आवश्यक आहे. तसेच दहावीपासून पुढील शिक्षणापर्यंत किमान ६० % गुण असणे बंधनकारक आहे. वयोमर्यादा कमाल २६ वर्षे आहे.
ज्युनियर इंजिनिअर-सी
इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा आवश्यक आहे. दहावीमध्ये किमान ६० % गुण असणे आवश्यक असून संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि संगणक ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे.
लायब्ररी असिस्टंट-सी
बीएससीसोबत बी. लिब. पदवी आणि संगणकीकृत ग्रंथालयात किमान ४ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी कमाल वयोमर्यादा ३४ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
पगार किती मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार आकर्षक वेतन दिले जाणार आहे.
वैज्ञानिक-सी: लेव्हल-१० नुसार ५६,१०० ते १,७७,५०० रुपये प्रति महिना
ज्युनियर इंजिनिअर-सी: लेव्हल- ६ नुसार ३५,४०० ते १,१२,४०० रुपये प्रति महिना
लायब्ररी असिस्टंट-सी: लेव्हल-६ नुसार ३५,४०० ते १,१२,४०० रुपये प्रति महिना
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी निवड प्रक्रिया पदानुसार वेगळी असेल
वैज्ञानिक-सी: लेखी परीक्षा आणि मुलाखत
ज्युनियर इंजिनिअर-सी आणि लायब्ररी असिस्टंट-सी: लेखी परीक्षा आणि स्किल/ट्रेड टेस्ट
अंतिम निवड उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे केली जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी IUAC च्या अधिकृत वेबसाइट www.iuac.res.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. सर्वप्रथम नोंदणी करून अर्ज फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि सही अपलोड करून अर्ज सबमिट करावा. आवश्यक असल्यास ऑनलाइन शुल्क भरावे लागेल.






