Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • खुलताबाद येथील भद्रा मारुती देवस्थान येथे हनुमान जयंतीनिमित्त भक्तांचा जनसागर
ताज्या बातम्या

खुलताबाद येथील भद्रा मारुती देवस्थान येथे हनुमान जयंतीनिमित्त भक्तांचा जनसागर

Bhadra Maruti Temple Hanuman Jayanti Crowd

Bhadra Maruti Temple Hanuman Jayanti Crowd : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या भद्रा मारुती देवस्थानात (Bhadra Maruti Temple) हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) आज भक्तांचा प्रचंड जनसागर उसळलेला पाहायला मिळाला. पहाटेपासूनच हजारो भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी (Crowd in the temple premises) केली होती. जय श्रीराम आणि जय हनुमानच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसरासह संपूर्ण खुलताबाद शहरात मोठी वर्दळ निर्माण झाली होती.

हेही वाचा – शिंदे गटाच्या बड्या नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नेमकं प्रकरण काय?

आज पहाटे भद्रा मारुतीची महाआरती मंत्री अतुल सावे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. आरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

भद्रा मारुती देवस्थान हे राज्यातील एक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान मानले जाते. विशेष म्हणजे येथे मारुतीरायांची मूर्ती निद्रिस्त अवस्थेत आहे, जी अत्यंत दुर्मिळ मानली जाते. देशभरातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने मंत्री अतुल सावे यांनी राज्यातील जनतेच्या सुख-समाधानासाठी तसेच महाराष्ट्र आणि देशावर आलेली संकटे दूर व्हावीत यासाठी प्रार्थना केली. राज्यात शांतता, समृद्धी आणि भरभराट नांदावी, असे साकडेही त्यांनी मारुतीरायांच्या चरणी घातले.

दरम्यान, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच स्वयंसेवकांकडून भाविकांना दर्शनासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात येत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts