Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • सभागृहातील दादांची रिकामी खुर्ची पाहून, आदिती तटकरे ढसाढसा रडल्या…
Top News

सभागृहातील दादांची रिकामी खुर्ची पाहून, आदिती तटकरे ढसाढसा रडल्या…

Aditi Tatkare emotional

Aditi Tatkare emotional : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी अजितदादांना (Ajit Pawar) जाऊन महिना होत आला, आम्हाला सर्वांना कुठेतरी वाटायचं ते आमच्यामध्ये असतील, असं वाटायचं पण तो भ्रम आज सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर तुटला, असं म्हटलं. कारण या सभागृहावर त्यांचं प्रचंड प्रेम, आ सभागृहात ज्यावेळे त्या खुर्चीवर त्यांना बघितलं नाही, त्यावेळेला ही वस्तूस्थिती मान्य करुन या नेत्याशिवाय आयुष्य जगावं लागेल, हे दुर्दैवानं आज बोलावं लागतंय, असं आदिती तटकरे म्हणाल्या. यावेळी त्यांना रडू आवरलं नाही.

हेही वाचा – “अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे समुद्रात नेऊन बुडवावा, ती त्यांना आदरांजली ठरेल”;रोहित पवारांची मागणी

आदिती तटकरे यांना देखील अजित पवार यांच्याबद्दल बोलताना अश्रू अनावर झाले. अनेकांनी माझ्या आधी दादांबद्दल भावना व्यक्त केल्या. 35-40 वर्ष त्यांनी संगळ्यांनी दादांसोबत काम केलं. अजितदादांना भेटले त्यावेळी माझं वय 12 वर्ष होतं. 2012 साली राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेची स्थापना अजितदादा आणि सुप्रिया ताईंच्या मार्गदर्शनाखाली झाली. अजित दादांचा जनता दरबार पावणे सात वाजता सुरु व्हायचा. राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेचं पद मिळालं त्याचं नियुक्तीपत्र सकाळी 7.10 वाजता त्यांच्या हस्ते मी स्वीकारव तेव्हापासून मी त्याच्या सोबत काम करते, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

सभागृहात कामकाज कसं करावं हे दादांकडून शिकले

2019 ला मी विधानसभेत आले तेव्हा, या सभागृहात कामकाज कसं करावं हे मी दादांकडून शिकले. बजेट, पुरवणी मागण्यांवर कसं बोलावं, बाब क्रमांक, पान क्रमांक याचा उल्लेख कसा करायचा हे अजितदादांनी सांगितलं. नागपूरच्या अधिवेशनात आम्हा सगळ्यांना लॉबीत घेऊन ते बसले. आमचं सभागृहात बोलणं होई पर्यंत ते थांबायचे. ते म्हणायचे की माझ्या मुलांचं अजून बोलणं झालं नाही, असं ते म्हणायचे, असं आदिती म्हणाल्या.

कणभर जरी प्रशंसा केली तर काम करण्याचं प्रोत्साहन मिळालं

अजित पवार यांचं दुःखद निधन झालं, त्यावेळेला सगळेच त्यांच्या कामाचं कौतुक करत होते. एक कार्यकर्ता म्हणून वाटायचं की हयातीत त्यांच्याबद्दल जे ऐकायचं होतं, त्यांनी या राज्यासाठी काय केलं, महाराष्ट्रासाठी काय केलं ते दुर्दैवानं ते नसताना ऐकायला मिळतंय. आज जे ऐकायला मिळतंय ते असताना कणभर जरी प्रशंसा झाली असती तर काम करण्याचं प्रोत्साहन त्यांना मिळालं, असतं, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

तो रुबाबदार पणा बघून आम्हाला अभिमान वाटायचा

अजितदादा आम्हाला सांगायचे, तुम्ही मंत्रालयात दिले पाहिजेत. 28 जून 2024 रोजी त्यांनी अर्थसंकल्प सादर केला, ज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. आपल्या प्रत्येकाचा एक नेता असतो, त्या नेत्याच्या नेतृत्त्वात आपण काम करत असतो. तो नेता आपला अभिमान असतो, तो नेता आपला माज असतो, हा आमचा रुबाबदार नेता, चालत यायचे तेव्हा तो रुबाबदार पणा बघून आम्हाला अभिमान वाटायचा. आज नेता जात असताना, तो रुबाबदार नेता एकटा गेला नाही, कार्यकर्ता म्हणून आमचा रुबाबदारपणा आणि माजही निघून गेला, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.

अजितदादांचे तिथून आमच्यावर बारकाईने लक्ष असेल

अजितदादा जिथे कुठे असतील तिथे बारकाईने आमच्यावर लक्ष असेल. आपल्या नावानंतर आईचं नाव लावायचा हा निर्णय घेतला त्यावेळी मंत्रालयात ती पहिली लावली ती अजित आशाताई अनंतराव पवार अशी होती. एकच वादा अजित दादा असं म्हणत आदिती तटकरेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला, त्यावर आदिती तटकरे बोलत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts