Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पोरानं पोरीकडे पाहिलं, बापाला खटकलं; मुलीचे केस कापून टक्कल केल्याचा प्रकार अमरावतीत उघडकीस
ताज्या बातम्या

पोरानं पोरीकडे पाहिलं, बापाला खटकलं; मुलीचे केस कापून टक्कल केल्याचा प्रकार अमरावतीत उघडकीस

Amravati

Amravati: अमरावती जिल्ह्यातील वरूड पोलीस ठाणे हद्दीतून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे केस कापून तिला टक्कल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, हे कृत्य तिच्या आई-वडिलांनीच केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शिक्षण घेत असून तिच्यावर एका तरुणाची वाईट नजर असल्याचा संशय तिच्या पालकांना होता. संबंधित तरुणाविरुद्ध पोलिसात तक्रार द्यावी, असा सल्ला पालकांनी दिला होता. मात्र मुलीने तक्रार न दिल्याने पालकांनी टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: पक्षांतराचा मोठा फटका! Gen Z चा राग, राघव चड्ढा यांचे 10 लाख फॉलोअर्स कमी; सोशल मीडियावर अनफॉलो मोहिम

मुलीचे केस आणि तिच्या सौंदर्यामुळे मुलांचे आकर्षण वाढते, असा चुकीचा समज करून पालकांनी तिचे संपूर्ण केस कापून तिला घरातच ठेवले, असा आरोप आहे. या प्रकाराला मुलीने विरोध केला, मात्र तिचे ऐकण्यात आले नाही.

या घटनेनंतर पीडित मुलीने थेट वरूड पोलीस ठाण्यात धाव घेत आई-वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत दोन्ही पालकांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीला संरक्षणाच्या दृष्टीने महिला व बालविकास विभागाच्या निरीक्षणगृहात दाखल केले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, समाजातूनही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वाईट प्रवृत्तीला आळा घालण्याऐवजी मुलीवरच बंधने घालणे योग्य नाही, अशी भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts