Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “अजित पवार… अनगरकरांचा नाद करायचा नाही;” बाळराजेंकडून आधी चॅलेंज, नंतर ‘यू टर्न’
Top News

“अजित पवार… अनगरकरांचा नाद करायचा नाही;” बाळराजेंकडून आधी चॅलेंज, नंतर ‘यू टर्न’

Balraje Patil and Ajit Pawar Image

Angar Nagar Panchayat | सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत यंदा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या 60 वर्षांपासून बिनविरोध होत असलेल्या अनगर नगरपंचायत निवडणुकीत यंदा नगराध्यक्षपदासाठी चुरस पाहायला मिळणार असे वाटत असतानाच पुन्हा एकदा बिनविरोध झाली. उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा अर्ज बाद झाल्यामुळे येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे, राजन पाटील यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि समर्थकांनी नगरपंचायतीसमोर विजयी जल्लोष साजरा केला. यावेळी राजन पाटीलांचे ज्येष्ठ सुपुत्र बाळराजे पाटील यांनी थेट अजित पवारांनाच चॅलेंज दिलं. अजित पवार.. कुणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही, असं म्हणत इशारा देत असलेला व्हिडिओ फक्त सोलापूर जिल्ह्यातच नाहीत तर अख्खा महाराष्ट्रात व्हायरल झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत यंदा चांगलेच ट्विस्ट पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमदेवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, छाननीमध्ये त्यांचा अर्ज बाद झाल्याने येथील निवडणूक पुन्हा एकदा बिनविरोध होत असल्याचं स्पष्ट झालं. थिटे यांचा अर्ज बाद होताच माजी आमदार आणि भाजप नेते राजन पाटील समर्थकांनी जल्लोष केला. त्यामध्ये, राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी थेट अजित पवारांनाच चॅलेंज केलं होतं, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार समर्थकांनी राजन पाटलांवर थेट हल्लाबोल केला. त्यानंतर काही वेळातच राजन पाटील व बाळराजे पाटील या बाप-लेकाने अजित पवारांची माफी मागितली आहे.

हेही वाचा – नितीशकुमार सलग दहाव्यांदा मुख्यमंत्री! नरेंद्र मोदींच्या उपस्थित शपथविधी संपन्न

राजन पाटलांकडून पवार कुटूंबाची जाहीर माफी

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनीही पत्रकार परिषद घेऊन अजित पवार आणि पवार कुटुंबीयांची माफी मागितली. भावनेच्या भरात बाळराजेंकडून नकळत काही अपशब्द गेले, ते अजिबात समर्थनार्थ नाही. अजित दादांनी पार्थ पवार आणि जय पवारप्रमाणे आपला मुलगा समजून बाळराजेंना माफ करावं. बाळराजेंच्या वक्तव्याबाबत मी अंत:करणातून शरद पवार, अजित दादा आणि संपूर्ण पवार कुटुंबाची माफी मागतो, असे म्हणत बाळराजे यांच्या व्हायरल व्हिडिओ नंतर दिलगिरी व्यक्त केली.

बाळराजे पाटलांचा ‘यू टर्न’

अजित दादांना चॅलेंज देण्याइतका मी मोठा नाही, माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. अजितदादांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत दिलगीरी व्यक्त करतो, असे म्हणत अजित पवारांना चॅलेंज देणाऱ्या बाळराजे पाटील यांनी घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. पण, अजितदादांचे काही लोक आमच्या परिवाराला बदनाम करत होते असे म्हणत उमेश पाटलांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील, असेही बाळराजे पाटील यांनी म्हटलं.

नेमका काय प्रकार घडला होता ?

अनगर नरपरिषद निवडणुकीत भाजपच्या प्राजक्ता पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यामुळे येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक जवळपास बिनविरोध झाल्याचं स्पष्ट झालं. निवडणूक अधिकार्‍यांनी प्राजक्ता पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र दिल्यानंतर राजन पाटीलांसह त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि समर्थकांनी विजयी जल्लोष केला. यावेळी, बाळराजे पाटील यांनी थेट अजित पवारांनाच चॅलेंज दिलं. अजित पवार.. कुणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही, असे म्हणत इशारा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

बाळराजे पाटलांनी पंडित देशमुखांचा खून केला

जो आता अजित दादांना चॅलेंज करतोय, त्या बाळराजे पाटलांनी पंडित देशमुखांचा खून केला आहे. यांचा बाप राजन पाटील यांनी जाहीर भरसभेत सांगितलं होतं की, माझ्या बोरांनी १७ व्या वर्षी ३०२ सारखी कलम भोगली आहेत. आणि तुम्ही आम्हाला भीती दाखवताय? अशा प्रकारे, गुंडागर्दीचं, दादागिरीचं, दहशतीचं जाहीर समर्थन करणारा नेता जर तिथ होता, मग त्यांच्या पोरांकडून वेगळी अपेक्षा काय करावी, अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सोलापूर जिल्हाप्रमुख उमेश पाटील यांनी बाळराजे आणि राजन पाटलांवर केली आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts