• Home
  • ताज्या बातम्या
  • Shubman Gill Health Update | बीसीसीआयने शुभमन गिल बाबत दिली महत्त्वाची अपडेट! “तो संघासोबत गुवाहाटीला जाईल, पण…”
Top News

Shubman Gill Health Update | बीसीसीआयने शुभमन गिल बाबत दिली महत्त्वाची अपडेट! “तो संघासोबत गुवाहाटीला जाईल, पण…”

bcci-update-shubman-gill-health

Shubman Gill Health Update : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. दक्षिण आफ्रिका या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाईल. भारताचा कर्णधार शुभमन गिल या सामन्यात खेळेल की नाही याबद्दल अजूनही सस्पेन्स आहे. बुधवारी बीसीसीआयने शुभमन गिलच्या दुखापतीबाबत वैद्यकीय अपडेट शेअर केले. बीसीसीआयने सांगितले की, शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियासोबत गुवाहाटी येथे पोहोचेल, परंतु तो सामना खेळू शकेल की नाही, हे नंतर ठरवले जाईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना आणखीन दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा – शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर? गिलची जागी “ही” ३ नावे चर्चेत

कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुभमन गिलच्या मानेला दुखापत झाली. बोर्डाने सांगितले की तो बरा होत आहे आणि त्याच्यात सुधारणा दिसून येत आहे, त्यामुळे तो संघासोबत गुवाहाटीला जाणार आहे.

गिल कधी जखमी झाला?

भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिलला कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मानेला दुखापत झाली. पहिल्या डावात फक्त तीन चेंडू खेळल्यानंतर तो निवृत्त झाला. तो फलंदाजीसाठी परतला नाही आणि दिवसाचा खेळ संपल्यानंतर कोलकात्याच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. तिसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी, बीसीसीआयने गिलच्या प्रकृतीबद्दल अपडेट जारी केले आणि तो उर्वरित सामना खेळू शकणार नाही याची पुष्टी केली.

पहिला सामना कसा होता?

कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ३० धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात १५९ धावा केल्या, त्यानंतर भारताने १८९ धावा करून ३० धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात गिलच्या अनुपस्थितीचा भारताला मोठा धक्का बसला. त्याच्या अनुपस्थितीचा संघावर स्पष्ट परिणाम झाला आणि भारत चौथ्या डावात १२४ धावांचे सोपे लक्ष्य गाठू शकला नाही, परिणामी दक्षिण आफ्रिकेला ३० धावांनी पराभव पत्करावा लागला. जर गिल दुसऱ्या कसोटीसाठी अनुपलब्ध असेल तर ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करेल. त्याच्या जागी देवदत्त पडिकल, साई सुदर्शन किंवा नितीश रेड्डी यांना अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts