Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • “तुम्ही वासेपूरचे डॉन तर मी पण महाराष्ट्राचा मराठा…”,प्रणित मोरेने झीशान कादरीची बोलतीच केली बंद
ताज्या बातम्या

“तुम्ही वासेपूरचे डॉन तर मी पण महाराष्ट्राचा मराठा…”,प्रणित मोरेने झीशान कादरीची बोलतीच केली बंद

Pranit More Bigg Boss
205

बिग बॉस 19‘ Pranit More Bigg Boss यंदाचं पर्व खऱ्या अर्थाने खास आहे. या पर्वात मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे सुद्धा पाहायला मिळतोय. आता त्याने त्याच्या कॉमेडियन अंदाजात बिग बॉसच्या घरालाच हास्याचा कट्टा बनवून टाकलं आहे.

बिग बॉसकडून सदस्यांना ‘द बीबी शो’ हा टास्क देण्यात आला होता. यामध्ये सदस्यांना स्वत:चे टॅलेंट दाखवायचं होतं. या टास्कमध्ये प्रणितने घरातील प्रत्येक सदस्यांवर विनोद करत सदस्यांना हसून लोटपोट केलं. पण हे जोक करण्याबरोबरच प्रणितने घरातील काही सदस्यांना चोख उत्तरही दिलं. गँग्स ऑफ वसेपूर फेम झीशान कादरीची प्रणितने त्याच्या स्टाईलने विनोद करत बोलती बंद केली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये झीशान कादरी वासेपूरबद्दल बोलताना दिसत आहेत. तसंच प्रणितबद्दलही ते बोलत आहेत. त्याला प्रणितने त्याच्या विनोदातून उत्तर दिलं आहे. झीशान भाईने गँग्स ऑफ वासेपूर सिनेमा लिहिला. हा सिनेमा त्यांनी यासाठी लिहिला कारण ते धनबड इथले आहेत. ते प्रत्येक वेळी वासेपूरच्या गोष्टी सांगत असतात. तिथले गुंडे, तिथले डॉन याबद्दल ते बोलत असतात. जर तुम्ही वासेपूरचे डॉन आहात तर मी पण महाराष्ट्राचा मराठा आहे. जोपर्यंत प्रेमात बोलतोय तोपर्यंत ठीक आहे.नाहीतर मग घरी सोडून येईल’,असं म्हणत प्रणितने झीशना कादरीची बोलती बंद केली आहे.या वक्त्यामुळे बिग बॉसच्या घरात आणि सोशल मीडियावर कमालीचा उन्माद निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts