CBSE 10th and 12th Results: सीबीएसई दहावी-बारावीच्या परीक्षा संपून काही दिवस झाले आहेत, आणि सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. चला तर पाहूया, निकाल कधी जाहीर होणार आहे.
जर तुम्हीही सीबीएसई दहावी आणि बारावी निकाल २०२६ चा उत्सुकतेने वाट पाहत असाल, तर ही खास माहिती तुमच्यासाठी आहे. मागील वर्षाप्रमाणेच, यंदाही निकाल मे महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी DigiLocker, SMS, अॅप्स आणि अधिकृत वेबसाईटवरून सहज पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स cbse.gov.in आणि results.cbse.nic.in.ला भेट द्या. चला तर जाणून घेऊयात निकाल कसा पाहावा.
DigiLocker वर निकाल कसा पाहावा?
गुणपत्रिका जाहीर झाल्यावर डिजिटल गुणपत्रिका पाहण्यासाठी डिजीलॉकर सोपे आहे.
सर्वप्रथम डिजीलॉकर वेबसाइट किंवा ॲपवर लॉगिन करा.
त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ६ अंकी सुरक्षा पिन टाका.
ओटीपी पडताळणी पूर्ण करा.
लॉगिन केल्यानंतर, “जारी केलेले कागदपत्र” (Issued Documents) विभागात जा.
सीबीएसई इयत्ता १० वी गुणपत्रिका २०२६ / सीबीएसई इयत्ता १२ वी गुणपत्रिका २०२६ वर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर आणि स्कूल कोड टाका.
माहिती भरल्यानंतर, तुमची डिजिटल गुणपत्रिका स्क्रीन दिसेल. तुम्ही ती डाउनलोड करून ठेवू शकता.
इतर पर्याय जे तुम्ही पाहू शकता
गुणपत्रिका जाहीर होण्याच्या दिवशी वेबसाइटवर जास्त रहदारी (ट्रॅफिक) असल्यास समस्या येऊ शकते. अशा परिस्थितीत, विद्यार्थी खालील पर्यायांचा वापर करू शकतात:
उमंग ॲप (UMANG app)
एसएमएस सेवा (SMS service)
आयव्हीआरएस सुविधा (IVRS facility)
या सर्व पद्धती सहज उपलब्ध आहेत आणि इंटरनेटवरही काम करतात.
उत्तीर्ण होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता आहे?
CBSE नियमांनुसार, प्रत्येक विषयात किमान ३३% गुण मिळवणे आवश्यक आहे.
जर विषयात सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक दोन्ही असतील, तर प्रत्येकात स्वतंत्रपणे ३३% गुण आवश्यक आहेत.
विद्यार्थी थोड्या गुणांनी कमी पडल्यास, सीबीएसई सवलतीचे गुण देऊ शकते.












