Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • पाकिस्तानच्या कुठल्या दहशतवादी संघटनांकडून भारताला धोका? अमेरिका काँग्रेस संशोधन युनिटचा अहवाल काय सांगतोय?
Top News

पाकिस्तानच्या कुठल्या दहशतवादी संघटनांकडून भारताला धोका? अमेरिका काँग्रेस संशोधन युनिटचा अहवाल काय सांगतोय?

terrorist org.

Threat to India from various terrorist organizations in Pakistan: पाकिस्तानकडून (pakistan) सातत्याने दहशतवादी हल्ले केले जात आहेत. त्यामुळे भारतात (india)  मोठी अशांतता निर्माण होत आहे. भारतातातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तानच जबाबदार आहे, अशा प्रकारचे सातत्याने भारताकडून सांगितले जात आहे. या भारताच्या प्रचाराला आता पुष्टी मिळत आहे. पाकिस्तानमधील विविध दहशतवादी संघटनांकडून भारताला धोका असल्याचे अमेरिका काँग्रेस संशोधन युनिटने अहवाल (U.S. Congressional Research Unit Report ) सादर केला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या या कारवाया रोखायच्या कशा असा प्रश्न भारतासमोर उभा राहिला आहे.

हे ही वाचा: लष्करी खर्चाचा सरकारी तिजोरीवर भार; रशियावर सोने विक्रीचा मार; बाजारावर काय परिणाम?

दहशतवाद्यांनी पसरवलेल्या जाळ्यांवर प्रकाशझोत

अमेरिकी काँग्रेसचे संशोधन युनिट असलेल्या ‘यूएस काँग्रेस रिसर्च सर्व्हिस’ने एक अहवाल जारी केला आहे. या अहवालात जम्मू आणि काश्मीरशी संबंधित दहशतवाद्यांनी पसरवलेल्या जाळ्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या अहवालात दहशतवाददी संघटनांवर टीकेची झोड उठवली गेली आहे.
भारतात, काश्मीरमध्ये लश्कर-ए-तैबा, जैश-ए-मोहम्मद, हरकत-उल-जिहाद इस्लामी, हरकत-उल-मुजाहिदीन आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांकडून दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे भारतात मोठी अशांतता पसरली जात आहे.

पाकिस्तानला जागतिक स्तरावर सज्जड दम

दशवादी कारवाया करू नका असे अनेकदा पाकिस्तानला जागतिक स्तरावर सज्जड दम दिलेला आहे. भारतानेही त्यांना बजावण्यात आले आहे. परंतु पाकिस्तानच्या कारवाया थांबण्याचे नाव घेत नाहीत. उलट त्यात वाढ होताना दिसत आहेत. परिणामी पाकिस्तानला कसे रोखून धरायचे असाही प्रश्न निर्माण झाला आहे. हा अहवाल दक्षिण आशिया तज्ज्ञ के. ॲलन क्रोनस्टॅड यांनी तयार केला आहे. अमेरिकन खासदारांना प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीबद्दल माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या या अहवालात, दहशतवादी संघटनांचे जागतिक, अफगाणिस्तान-केंद्रित, भारत (काश्मीर)-केंद्रित, देशांतर्गत आणि सांप्रदायिक, शिया-विरोधी, अशा पाच श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे.

पहलगामवर पाकिस्तानचा हल्ला

पाकिस्तानातील अनेक दहशतवादी संघटनांनी भारतावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. भारतात अशांतता कशी राहील याचीच आखणी पाकिस्तानकडून केली जाते. त्यामुळे दहशवादी कारवाया थांबण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने दहशतवादी कारवाई करत पहलगामवर हल्ला केला होता. त्यात निष्पाप पर्यटक लोकांचे जीव गेले होते. त्यामुळे भारताने ऑपरेशन शिंदूर ही मोहीम राबवून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता. तरीही पाकिस्तानची खुमखुमी कमी होत नाही. सातत्याने पाकिस्तानच्या दहशवादी कारवाया होत असल्याने त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणे करावे लागणार आहेत.

लष्कर ए तैयबाचा उल्लेख

अमेरिकी काँग्रेसचे संशोधन युनिट असलेल्या ‘यूएस काँग्रेस रिसर्च सर्व्हिस’ने दिलेल्या अहवालात लष्कर ए तैयबाचा उल्लेख करण्यात आला आहे. लष्कर-ए-तैयबा पाकिस्तानस्थित एक अत्यंत धोकादायक इस्लामिक दहशतवादी संघटना आहे, जिची स्थापना हाफिज सईदने केली आहे. याचा मुख्य उद्देश काश्मीरला पाकिस्तानात विलीन करणे आणि भारतात दहशतवादी हल्ले करणे हा आहे. २००८ चा मुंबई हल्ला, २००१ ची संसदेवरील हल्ल्यासह अनेक मोठ्या हल्ल्यांसाठी ही संघटना जबाबदार आहे. त्यामुळे या संघटनेपासून भारताने सावधगिरी बाळगायला हवी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts