Delhi blast : राजधानी दिल्ली स्फोटाने हादरली, ही बातमी आली अन् संपूर्ण देश हळहळला. सुरुवातीला कार अपघात वाटणार प्रकरण हळुहळु समोर यायला लागलं. त्यानंतर त्यातील एक-एक धागे दोरे समोर येऊ लागले. काही वेळातच हा कार अपघात नसून घडवून आणलेला घातपात असल्याच स्पष्ट झालं. यामध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास २४ लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. पण दिल्लीत नेमकं काय घडलं. पोलीस अधिकाऱ्यांनी काय माहिती दिलीय, या स्फोटाच पुलवामा कनेक्शन, अन् आत्ता पर्यंतच्या तपासात काय समोर आलंय याबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊया..
सोमवारी संध्याकाळी साधारणतः 7 वाजेच्या सुमारास गाडीला आल लागल्याचा नियंत्रण कक्षाला फोन आला. लाल किल्ला परिसरात गेट नंबर एक जवळ हा स्फोट झाला. या स्फोट एवढा भीषण होता की बघता बघता १० गाडींनी पेट घेतला. आजूबाजूच्या घरांना हादरे बसले तर काही घरांच्या काचा फुटल्या. स्फोटाची भीषणता लक्षात घेता नियंत्रण कक्षाची सर्व पथके घटनास्थळी धावली. तपास यंत्रणांची लागलीच आजूबाजूचा परिसर शील केला. देशाची राजधनी हादरली म्हणल्यावर हा हादरा देशातल्या गल्ली बोळीपर्यंत पोहोचला वेळ लागला नाही. बातमी वाऱ्याच्या वेगाने देशभर पसरली आणि नेते मंडळींकडून शोक व्यक्त करायाला सुरूवात झाली. त्यानंतर साधारणतः साडे दहा वाजता देशाचे गृहमंत्री अमित शहा घटनास्थळाची पाहाणी केली. त्यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून घटनेची सर्व माहिती घेतली. मग सीसीटीव्हीच्या आधारे हळुहळु या स्फोटाबद्दल माहिती येयला सुरुवात झाली.
हेही वाचा – श्रीनगरच्या नौगाम पोलिस स्टेशनमध्ये स्फोट, निरीक्षकासह १० जणांचा मृत्यू; दिल्ली बॉम्बस्फोटाचे कनेक्शन
लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ जिथ हा स्फोट झाला त्या रस्त्यावर आय-२० गाडी सिग्ननला थांबली आणि तिथ या गाडीच्या मागच्या बाजूला हा स्फोट झाला. या भीषण स्फोटामुळे या गाडीचे हजारे तिकडे होऊन वेगवेगळ्या दिशेला विखुरले होते. मात्र, तपास यंत्रणांनी गाडीचे काही भाग जोडत गाडीची नंबर प्लेट शोधली आणि त्यातून ही गाडी हरियाणाची असल्याचे समोर आले. त्यानंतर हरियाणाच्या तपास यंत्रणांना अलार्ट करण्यात आलं आणि तपासान वेग पकडला. ही HR 26 7624 गाडी गुरुग्रामच्या मोहम्मद सलमान या व्यक्तीची असल्याचं कागदपत्रांवरून समोर आलं. तपास यंत्रणांनी तातडीने कारवाई करत सलमानला ताब्यात घेतलं. सलमानने ही कार जम्मू आणि काश्मीरमधील तारिक नावाच्या व्यक्तीला विकल्याचं सांगितलं. आणि त्यानंतर काही धारेदोरे जोडत तपास यंत्रणा पुलवामा हल्ल्यापर्यंत पोहोचल्या.
ही कार अनेक वेळा खरेदी आणि विक्री करण्यात आली. त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण अधिक संशयास्पद बनलं आहे. ९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री जम्मू-काश्मीर आणि फरिदाबाद पोलिसांनी स्फोटक बनवण्यासाठी वापरलं जाणारं धोकादायक रसायन जप्त केलं होतं. जातं. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की, दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरण धोकादायक रसायनांच्या जप्तीशी संबंधित असू शकत. यावेळी पोलिसांनी २ हजार ९०० किलो आरडीएक्स, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आलं अन् सात जणांना गजाआड केलं होतं, ज्यामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश होता. जैश-ए-मोहम्मद आणि अंसर गजवात-उल-हिंद यांच्याशी संबंधित आंतरराज्यीय दहशतवादी नेटवर्कचा पदार्फाश करताना ही कारवाई करण्यात आली होती. दिल्लीत स्फोट झालेली आय २० कार पुलवामा येथील तारिक नावाच्या व्यक्तीची होती. त्यामुळे, सुरक्षा एजन्सी या प्रकरणाचा प्रत्येक कोनातून तपास करत आहेत.
दिल्ली स्फोटात केवळ डॉक्टर उमर आणि डॉ. मुजम्मिल यांचेच नाव आहे, असं नाही तर दहशतवादी नेटवर्कमध्ये अनेक डॉक्टर्सचा समावेश असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. यामध्ये डॉक्टर शाहीन, डॉक्टर आदिल आणि डॉक्टर मोहिउद्दीन यांचाही समावेश असल्याचं उघड झालं आहे. या ब्लास्टमागे पाच डॉक्टरांची गँग असल्याचं समजतंय. या घटनेवर जगभरातील देशांतून प्रतिक्रिया आल्या आहेत. भारतातील इराणच्या दूतावासाने दिल्लीमध्ये झालेल्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसंच बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांनी देखील घटनेवर शोक व्यक्त केलाय.











