Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • श्रीनगरच्या नौगाम पोलिस स्टेशनमध्ये स्फोट, निरीक्षकासह १० जणांचा मृत्यू; दिल्ली बॉम्बस्फोटाचे कनेक्शन
Top News

श्रीनगरच्या नौगाम पोलिस स्टेशनमध्ये स्फोट, निरीक्षकासह १० जणांचा मृत्यू; दिल्ली बॉम्बस्फोटाचे कनेक्शन

फरिदाबादमधील एका व्हाईट कॉलर दहशतवादी नेटवर्ककडून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा शुक्रवारी रात्री उशिरा श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे पोलिस स्टेशनचा एक भाग कोसळला आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग लागली. या स्फोटात एका पोलिस निरीक्षकासह दहा जणांचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे मृत्यूची माहिती देण्यात आलेली नाही. 

स्फोटाच्या वेळी डीएसपी दर्जाचा अधिकारी आणि तहसीलदारासह सुमारे ५० जण पोलिस स्टेशनच्या इमारतीत उपस्थित असल्याचे वृत्त आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जण जखमी झाले आहेत, त्यापैकी ७ जण पोलीस आहेत. पाच जणांना आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये आणि उर्वरितांना श्रीनगरमधील दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला झाल्याचे नाकारले असून हा अपघात असल्याच म्हटल आहे.

दहशतवादी टोळीकडून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट

दिल्ली बॉम्बस्फोटात अटक केलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदच्या व्हाईट कॉलर दहशतवाद्यांच्या टोळीकडून फरिदाबादमध्ये जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटच्या स्फोटामुळे हा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. स्फोट झाला तेव्हा एफएसएल टीम आणि अधिकारी दहशतवादी नेटवर्ककडून जप्त केलेल्या स्फोटकांची तपासणी करत होते.

हेही वाचा – एकाच कुटुंबातील ५ जणांचे घरात सापडले मृतदेह; ५ दिवसांपूर्वीच मुंबईहून गेले होते गावाकडे..

३६० किलोग्राम अमोनियम नायट्रेटचा काही भाग एफएसएल लॅबमध्ये

फरिदाबादमध्ये अटक केलेल्या काश्मिरी दहशतवादी डॉ. मुझम्मिलच्या लपून बसलेल्या ठिकाणाहून जप्त केलेल्या ३६० किलोग्राम अमोनियम नायट्रेटचा काही भाग एफएसएल लॅबमध्ये होता, तर उर्वरित भाग नौगाम पोलिस स्टेशनच्या गोदामात साठवून ठेवण्यात आला होता. अधिकाऱ्यांच्या मते, २४ पोलिस आणि इतर तीन जणांना वेगवेगळ्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

रात्री ११.१५ च्या सुमारास हा स्फोट झाला

ऑक्टोबरमध्ये त्याच नौगाम परिसरात जैश-ए-मोहम्मदचे पोस्टर्स दिसले. त्यानंतर, व्हाईट कॉलर दहशतवाद्यांचे नेटवर्क उघडकीस आले, ज्यामुळे त्यांच्या नेटवर्कशी संबंधित डझनभर डॉक्टर आणि दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. हे पोलिस स्टेशन तपासाच्या केंद्रस्थानी होते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, रात्री ११.१५ च्या सुमारास हा स्फोट झाला आणि पोलिस स्टेशनच्या इमारतीचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला.

१४ किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटाचा आवाज 

हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज श्रीनगरमधील सुमारे १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या एसएमएचएस हॉस्पिटलपर्यंत ऐकू आला. पोलिस स्टेशनच्या आजूबाजूच्या अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. पोलिस स्टेशनच्या इमारतीला लागलेल्या आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या. पोलिस स्टेशनच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पोलिस आणि इतर वाहनांचे आगीत नुकसान झाले. स्फोट आणि आगीमुळे स्टेशन इमारतीसह परिसरात धूराचे लोट पसरले होते. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा स्फोट अपघाती होता आणि त्यात कोणताही दहशतवादी सहभागी नव्हता.

घटनास्थळाला छावणीचे स्वरूप

पोलिस कर्मचारी आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत फॉरेन्सिक टीम अमोनियम नायट्रेट-आधारित स्फोटकांची तपासणी आणि नमुने घेत असताना हा स्फोट झाला. पोलिसांनी हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. आगीची माहिती मिळताच रात्री ११:४५ वाजता अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलिस आणि सीआरपीएफ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. एसएसपी श्रीनगर, डीआयजी सेंट्रल काश्मीर रेंज आणि आयजी काश्मीर देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिस आणि सीआरपीएफ जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts