Natural Hair Mask | केसांची वाढ थांबली आहे आणि केस गळतीमुळे तुम्ही चिंतेत आहात का? महागड्या प्रॉडक्ट्सऐवजी घरच्या घरी तयार करता येणारा एक साधा पण प्रभावी हेअर मास्क (Hair Mask) तुमच्या केसांसाठी वरदान ठरू शकतो. नैसर्गिक घटकांनी बनवलेला हा मास्क केसांना मुळापासून पोषण देऊन त्यांची वाढ पुन्हा सुरू करण्यास मदत करतो आणि केस अधिक मजबूत, दाट आणि चमकदार बनवतो. चला तर मग हा हेअर मास्क नेमका कोणता आहे आणि कशापासून बनवायचा आहे? हे आपण जाणून घेऊया.
हेही वाचा – नारळाचे तेल की बदामाचे तेल? केसांसाठी कोणतं तेल आहे सर्वोत्तम? जाणून घ्या
केसांच्या वाढीसाठी कोणता हेअर मास्क आहे बेस्ट?
तुम्हाला माहित आहे का की दही हे पोषक तत्वांनी समृद्ध असते आणि ते केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. जर तुम्ही नैसर्गिकरित्या तुमच्या केसांची लांबी वाढवू इच्छित असाल तर दही हा एक उत्तम पर्याय असू शकतो. जर तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेताना या नित्यक्रमात दह्याचा योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने समावेश केला तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. चला तर मग दह्याचा हेअर मास्क बनवण्याची एक अतिशय सोपी पद्धत जाणून घेऊया.
दह्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वात आधी एका वाटीत थोडे दही घ्या. त्याच वाटीत एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस घाला. एकजीव पेस्ट तयार होईपर्यंत हे सर्व घटक व्यवस्थित मिसळा. अशाप्रकारे तुमचा हेअर मास्क तयार होते. तर औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेला हा मास्क तुमच्या केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो.
या मास्कचा वापर कसा करायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तुम्ही हा मास्क तुमच्या केसांच्या मुळांना व्यवस्थित लावा. सर्वोत्तम परिणामांसाठी तो 20 मिनिटे तसाच राहू द्या. 20 मिनिटांनंतर तुम्ही तुमचे केस धुवू शकता. तुम्ही हा हेअर मास्क आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता. यामुळे तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम दिसू लागतील. केसांची वाढ वाढवण्यासाठी आणि केसांची लांबी वाढवण्यासाठी या हेअर पॅकचा वापर केला जाऊ शकतो.












