Iran-Israel War | अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमधील युद्धाचा वणवा चांगलचा पेटताना दिसत आहे. या तिन्ही देशांमधील युद्ध कमी न होता वाढतच चालल्याचं पाहायला मिळत आहे. इराणने अमेरिकेच्या काही तळांवर हल्ला केल्यानंतर, अमेरिकेनेही इराणवर जोरदार प्रतिहार केला. या युद्धात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. सगळ्यात आधी इस्त्रायल-अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणने सर्वोच्च नेते म्हणून अली रजा अराफी (Ali Reza Arafi) यांच्या नावाची घोषणा केली होती. तर सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर काही तासातच त्यांनाही ठार करण्यात आले. त्यामुळे इराणचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा – खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पुत्र मोजतबा खामेनेई यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड
अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान
इराण सध्या अत्यंत वाईट परिस्थितून जात आहे. आधी त्यांचे दोन सर्वोच्च नेते ठार करण्यात आले, तर आता त्यांच्या युद्धनौका उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. तसेच इराणमधील शाळा, सरकारी इमारतींवरही अमेरिका, इस्त्रायलकडून हल्ला केला जात आहे. यामध्ये इराणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कोणताही देश त्यांच्यासोबत उभा राहिलेला नाहीये. त्यामुळे इराण स्वबळावर लढताना दिसत आहे.
अमेरिकेने इराणी युद्धनौकेला श्रीलंकेच्या हद्दीत लक्ष्य करत उद्ध्वस्त केले आहे. जेव्हा अमेरिकेने इराणी युद्धनौकेवर हल्ला केला तेव्हा जहाजावर 180 सैनिक होते. तर या हल्ल्यात 87 सैनिकांचा मृत्यू झाला असून इतर सैनिकांचा शोध सुरू आहे.
इराणने काय दिली धमकी?
अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यानंतर इराण देश आणखी आक्रमक झाला आहे. या युद्धादरम्यान इराणने आता पहिल्यांदाच मोठी धमकी दिली आहे. आम्ही थेट इस्त्रायल देशाच्या परमाणु ठिकाणांवर हल्ला करू, अशी थेट धमकी इराणकडून देण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे. तर आता इराणने दिलेल्या या धमकीनंतर हे युद्ध आणखी पेटणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.
इराणने अमेरिका आणि इस्त्रायल तळांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोन, मिसाईलचा वापर करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तर इराणने आत्तापर्यंत 9 देशांमधील 13 अमेरिकन तळांना लक्ष्य करत त्यांच्यावर हल्ला केला आहे. तर या युद्धात इराणसोबत अमेरिकेलाही मोठा फटका बसला आहे. या युद्धात अमेरिकेच्या 6 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांची इराणच्या नव्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यपूर्व आशियात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये मोठा राजकीय बदल घडल्याची चर्चा आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर देशाचे नेतृत्व कोणाकडे जाणार?, हा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर इराणमधील महत्त्वाची संस्था असेंबली ऑफ एक्सपर्ट यांनी अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांची देशाच्या सर्वोच्च नेतेपदी निवड केल्याची माहिती समोर आली आहे.












