Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • जय पवारांची इंस्टाग्रामवर पोस्ट व्हायरल, निवडणूक लढण्यावर दिले स्पष्टीकरण
Top News

जय पवारांची इंस्टाग्रामवर पोस्ट व्हायरल, निवडणूक लढण्यावर दिले स्पष्टीकरण

Jay Pawar Instagram Post

Jay Pawar Instagram Post : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी इंस्टाग्रामवर एक महत्त्वाची पोस्ट शेअर करून राजकीय चर्चेला उधाण दिले आहे. या पोस्टमध्ये जय पवार यांनी स्पष्ट केले की, ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार की नाही यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पक्ष नेतृत्व जनतेप्रति प्रामाणिक बांधिलकी, दूरदृष्टी आणि नेतृत्वगुण असलेला कार्यक्षम उमेदवार निश्चित करेल, यावर त्यांना पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये आदरणीय दादा (स्व. अजित पवार) यांच्या विकासभिमुख विचारसरणीचा उल्लेख करत म्हटले, “आदरणीय दादांची विकासभिमुख विचारसरणी आणि लोकहिताचे कार्य पुढे नेत, प्रलंबित प्रश्नांना ठोसपणे मार्गी लावणारा तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी निष्ठेने कार्य करणारा चेहरा पक्ष निश्चितपणे जनतेसमोर आणेल.” पक्षाच्या सामूहिक नेतृत्वावर आणि कार्यकर्त्यांच्या सामर्थ्यावर भर देणारा हा संदेश युवा नेत्याकडून आल्याने पक्षांतर्गत चर्चा वाढली आहे.

सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी

जय पवार हे नुकत्याच पार पडलेल्या बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी होते. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांच्या राजकीय वारसदारांमध्ये जय पवार यांच्याकडे अपेक्षा वाढल्या होत्या. अनेक ठिकाणी त्यांना स्थानिक निवडणुकीत उमेदवारी देण्याची चर्चा होती. मात्र, जय पवार यांनी स्वतः मागे राहून पक्षाला मजबूत उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या दूरदृष्टीची प्रशंसा होत आहे.

व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपेक्षा पक्षहिताला प्राधान्य देणारा

पक्षातील सूत्रांच्या मते, जय पवार यांचा हा निर्णय व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपेक्षा पक्षहिताला प्राधान्य देणारा आहे. ते सध्या स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांसोबत काम करत असून, भविष्यात विधानसभा किंवा इतर मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी स्वतःला तयार करत असल्याचे बोलले जाते. “मला पक्ष नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. ते योग्य व्यक्तीला संधी देतील,” असे जय पवार यांच्या पोस्टमधील मुख्य भावना आहे.

कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया

या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना जय पवार यांचा निर्णय त्यांच्या परिपक्वतेचे द्योतक वाटतोय, तर काहींना भविष्यातील मोठ्या राजकीय भूमिकेसाठी ते स्वतःला सावरत असल्याचे दिसते. बारामती आणि पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना ही घोषणा पक्षाच्या रणनीतीला नवी दिशा देणारी ठरू शकते.

जनतेच्या प्रलंबित प्रश्न सोडवण्यावर आणि विकासकामांवर भर

जय पवार यांनी पोस्टमध्ये जनतेच्या प्रलंबित प्रश्न सोडवण्यावर आणि विकासकामांवर भर दिला आहे. अजित पवार यांच्या वारशाला पुढे नेण्याच्या दृष्टीने हा निर्णय पक्षाला एकजूट दाखवणारा मानला जात आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळवत आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते यावर लवकरच प्रतिक्रिया देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts