Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असणारा आयपीएलचा १९ हंगाम कालपासून सुरू झालाय. मागील वर्षी आयपीएल चॅम्पियन राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने सनरायजर्स हैदराबादला जबरदस्त पहिल्याच सामन्यात ६ गडी राखून जबरदस्त मात दिली अन् पहिला विजय खेचून नाही ठासून आणला. मात्र, आता सर्वांचे लक्ष लागलंय ते आज असणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दुसऱ्या सामन्याकडे. दोन्ही संघातील खेळाडू जबरदस्त फाॅर्ममध्ये असल्याचे हा सामना तेवढाच डोळ्याचं पारणं फेडणारा असेल एवढं मात्र नक्की. त्याच संदर्भात दोन्ही संघात नेमकं कोणाचं पारडं जड आहे याविषयी थोडक्यात माहिती घेऊ…
हेही वाचा – महेंद्रसिंग धोनी IPLच्या बाहेर, कारण ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का
हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर अजिंक्य रहाणे याच्याकडे केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे पलटणने विजयी सुरवात करावी, अशा आशा चाहत्यांना आहे. त्यामुळे पलटणच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबईचा संघ कोलकत्ता संघाला उजवा ठरणार
मुंबई विरुद्ध कोलकाता यांच्यात आज रविवारी 29 मार्चला होणारा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील 36 वा सामना असणार आहे. याआधी दोन्ही संघ एकूण 18 मोसमात 35 वेळा आमेनसामने आले आहेत. मुंबईने या 35 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मुंबईने केकेआरचा 24 सामन्यांमध्ये धुव्वा उडवला आहे. तर केकेआरने 11 सामन्यांमध्ये पलटवार करत मुंबईला पराभवाची धुळ चारली आहे. त्यामुळे मागील एकडे पाहता मुंबईचा संघ कोलकत्ता संघाला उजवा ठरणार एवढे मात्र नक्की.
मुंबई संघात दिग्गज खेळाडूंची भर..
तसेच उभयसंघातील वानखेडे स्टेडियममध्ये होणारा हा 13 वा सामना असणार आहे. मुंबईने आतापर्यंत 12 पैकी 10 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर कोलकातानाने पलटणला घरच्या मैदानात 2 वेळा पराभूत केलंय. त्याचसोबत मुंबई संघात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, क्विंटन डीकॉक, दीपक चहर, जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट, यांसारख्या खेळाडूंची भर पडली आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ –
रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, नमन धीर, शार्दुल ठाकूर (ट्रेड), शेरफन रूदरफोर्ड (ट्रेड), मयंक मार्कंडे (ट्रेड), क्विंटन डीकॉक दीपक चहर, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, मिचेल सँटनर, कार्बिन बॉश, राज अंगद बावा, अल्लाह गजनफर, अश्वनी कुमार, रघु शर्मा, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत, दानिश मलेवार, मोहम्मद इझहर या खेळाडूंचा समावेश आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघ –
अजिंक्य रहाणे, रिंकू सिंह, अंगकृष रघुवंशी, मनीष पांडे, रोवमैन पॉवेल, राहुल त्रिपाठी, फिन एलन, तेजस्वी सिंह, टिम सीफर्ट, सुनील नरेन, अनुकूल रॉय, रमनदीप सिंह, कैमरून ग्रीन, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचित रवींद्र, हर्षित राणा, वैभव अरोडा, उमरान मलिक, मथीशा पथिराना, कार्तिक त्यागी, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती, प्रशांत सोलंकी या खेळाडूंचा समावेश आहे.












