Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • नागपूरमध्ये बारावीचा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा पेपर फुटला, व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रश्नपत्रिका व्हायरल
Top News

नागपूरमध्ये बारावीचा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा पेपर फुटला, व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रश्नपत्रिका व्हायरल

Class 12th paper leaked
2

12th Papaer Leack : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) बारावीच्या परीक्षेला पेपरफुटीचे ग्रहण लागल्याचे चित्र दिसत आहे. नागपुर विभागातील सेंट ऊर्सुला परीक्षा केंद्रावर (Sent Ursula Examination Centre) पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २१ विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रश्नपत्रिका (Question paper on WhatsApp group) परीक्षा सुरू होण्याच्या आधीच व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाने (Private coaching class teacher) पैसे घेऊन पेपर फोडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Crime at the police station) करण्यात आला आहे. तर दोन विद्यार्थिनींची कसून चौकशी (Thorough interrogation of students) पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा – बदलापूरात स्त्री बीजाची बेकायदा विक्री करणारे रॅकेट उघड; तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूरच्या सदर भागातील सेंट ऊर्सुला परीक्षा केंद्रावर फिजिक्स आणि केमिस्ट्री या महत्त्वाच्या विषयांचे पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार वॉशरूमला जात असल्याचा संशय पर्यवेक्षकांना आला. तिची झडती घेतली असता, तिच्याकडे स्मार्टफोन सापडला. धक्कादायक म्हणजे या फोनमध्ये परीक्षेपूर्वी एक तास आधीच आलेली प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरे पोलिसांना मिळून आली.

तपासात असे समोर आले आहे की, २१ विद्यार्थ्यांचा एक विशेष व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला होता. एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाने मोठ्या रकमेच्या बदल्यात हे पेपर पुरवल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

“आम्ही सदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून दोन विद्यार्थिनींची चौकशी सुरू आहे. या रॅकेटमध्ये शिक्षण विभागातील कर्मचारी किंवा आणखी मोठे मासे अडकले आहेत का, याचा तपास आम्ही करत आहोत,” अशी प्रतिक्रिया सदर पोलिस स्टेशनचे पीआय अमोल देशमुख यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts