Nitesh Rane On Rohit Pawar | अजित पवारांचे (Ajit Pawar) अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या अपघाताबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहे. अजित पवारांचा अपघात (Ajit Pawar Plane Crash) होता की घातपात होता? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामध्ये आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मागील महिन्यात पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर करत संशय असल्याचं म्हटलं होतं. तर आताही रोहित पवार यांनी आणखी एक पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर करत संशय व्यक्त केले आहेत.
हेही वाचा – अजित पवारांच्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत रोहित पवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले, तो डॅमेज झाला नाही…
रोहित पवारांनी पुरावे सादर करत म्हटलं की, अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्या बॉक्सवर रामचंद्र नावाचे डिरेक्टर आहेज जे 2023 ला असिस्टंट डायरेक्टर होते त्यांनी सही केली आहे. ते तो ब्लॅक बॉक्स ओके आहे असं म्हणाले आहेत. त्या ब्लॅक बॉक्सवर फक्त राख बसली आहे. ते डॅमेज झालेलं नाही. राख बसली म्हणून ब्लॅक बॉक्स डॅमेज झाला असं जर म्हणत असतील तर ही गोष्ट हास्यास्पद आहे. ब्लॅक बॉक्सच्या आत एक चीप असते. तो फोटो रिपोर्टमध्ये यायला हवा होता मात्र दुर्दैवानं तो आला नाही. तसेच अजितदादांच्या विमानातील सापडलेला ब्लॅक बॉक्स डॅमेज झालेला नाही, असा दावा राहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवारांना नितेश राणेंचा खोचक टोला
रोहित पवारांच्या या पत्रकार परिषदेवर आणि त्यांनी केलेल्या दाव्यावर मंत्री नितेश राणेंना (Nitesh Rane) प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी रोहित पवारांवर पलटवार केला. “रोहित पवार हे एव्हीगेशन एक्सपोर्ट झाले आहेत. कारण तुमची माहिती फॉर्मल अॅथोरिटीकडे द्या, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच देशाचा कायदा रोहित पवारांना माहिती आहे. आणि आता ते फक्त पायलट बनायचे बाकी आहेत, असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला आहे.











