Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Gudi Padwa Recipe: गोड खाऊन करा सण साजरा! सकाळच्या नाश्त्याला बनवा मऊ पायनॅपल शिरा, रेसिपी लगेच पाहा
ताज्या बातम्या

Gudi Padwa Recipe: गोड खाऊन करा सण साजरा! सकाळच्या नाश्त्याला बनवा मऊ पायनॅपल शिरा, रेसिपी लगेच पाहा

Pineapple Sheera Recipe: सकाळच्या नाश्त्याला आणि गुडीपाडवा सण साजरा करताना काही गोड आणि मऊ पदार्थ बनवायचा असेल, तर मऊ पायनॅपल शिरा बनवा. खूप सोपी रेसिपी आहे

सण-उत्सव किंवा सकाळची सुरुवात असो, गोड पदार्थ नाश्त्यासाठी बनवणे नेहमीच आनंददायक असते. पायनॅपल शिरा हा एक असा स्वादिष्ट पदार्थ आहे जो फक्त काही मिनिटांत तयार करता येतो आणि चवीतही अप्रतिम आहे. हलका गोडसर, मऊसर आणि फळांचा स्वाद असलेला हा शिरा सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. चला तर जाणून घेऊयात रेसिपीची कृती

साहित्य

रवा- १ कप
साखर – ३/४ कप
पाणी – २ कप
तूप२-३ चमचे
पायनॅपल- १ कप (चिरलेले)

वेलची पूड – १/४ टीस्पून

काजू व मनुके – २ टेबलस्पून (ऐच्छिक)

कृती

एका कढईत तूप गरम करा आणि त्यात रवा हलक्या आचेवर सोनसर होईपर्यंत परतवा.

दुसऱ्या पातेल्यात पाणी गरम करा, त्यात साखर टाका आणि साखर पूर्ण विरघळेपर्यंत हलवा.

रवा आणि पायनॅपल मिश्रणात गरम साखरेचे पाणी हळू हळू घाला, सतत ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या पडू नयेत.

मध्यम आचेवर शिरा गार होईपर्यंत शिजवा.

शेवटी वेलची पूड आणि आवडीनुसार काजू व मनुके घालून मिक्स करा.

गरम गरम सर्व्ह करा.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts