Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Easy Breakfast Recipe: रात्रीचा शिळा भात फेकू नका! सकाळच्या नाश्त्याला बनवा खुशखुशीत थालीपीठ, ही आहे सोपी रेसिपी
Top News

Easy Breakfast Recipe: रात्रीचा शिळा भात फेकू नका! सकाळच्या नाश्त्याला बनवा खुशखुशीत थालीपीठ, ही आहे सोपी रेसिपी

सकाळच्या नाश्त्याला बनवा खुशखुशीत थालीपीठ
0

Leftover Rice Thalipeeth Recipe: रात्रीचा उरलेला भात फेकण्याची सवय अनेक जण करतात, पण याच शिळ्या भातातून सकाळच्या नाश्त्यासाठी खुसखुशीत आणि चविष्ट थालीपीठ तयार करता येते. हे थालीपीठ झटपट बनते, पौष्टिक आहे आणि मुलंही आवडीने खातात. घरात उपलब्ध साध्या साहित्याने तुम्ही काही मिनिटांत ही स्वादिष्ट डिश तयार करू शकता. चला, पाहूया सोपी रेसिपी.

हेही वाचा: KD: The Devil चित्रपटातील नवीन गाणं रिलीज, नोरा फते आणि संजय दत्तचा धमाकेदार डान्स

बऱ्याच वेळ रात्रीचा भात उरतो आणि दुसरी दिवशी तो खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे अनेक जण तो फेकून देतात. पण थोडीशी कल्पकता वापरली तर याच शिळ्या भारतापासून सकाळी नाश्त्यासाठी चविष्ट आणि खुशखुशीत थालीपीठ तयार करता येते. हे थालीपीठ बनवायला सोपे असून पौष्टिकही आहे. घरात उपलब्ध साध्या साहित्याने तुम्ही काही मिनिटांत ही स्वादिष्ट डिश तयार करू शकता. चला, पाहूया साहित्य आणि कृती.

लागणारे साहित्य

1 कप शिळा भात

½ कप ज्वारी किंवा बाजरीचे पीठ (गव्हाचे पीठही वापरू शकता)

1 बारीक चिरलेला कांदा

1–2 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)

थोडी कोथिंबीर

½ चमचा जिरे

चिमूटभर हळद

चवीनुसार मीठ

तेल

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात शिळा भात घ्या आणि तो थोडासा मॅश करा. त्यामध्ये ज्वारी किंवा बाजरीचे पीठ घाला. नंतर चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे, हळद आणि मीठ घालून सर्व साहित्य एकत्र मिक्स करा. आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालून मऊसर पीठ तयार करा.

आता तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा. तयार केलेल्या पिठाचा गोळा तव्यावर ठेवून हाताने किंवा चमच्याने थालीपीठासारखा पसरवा. कडांना थोडे तेल सोडा आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या.

सर्व्ह करण्याची पद्धत

गरमागरम थालीपीठ दही, लोणी किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. सकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ झटपट तयार होतो आणि खूप चविष्टही लागतो.

 

 

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts