• Home
  • ताज्या बातम्या
  • पुण्यात बाणेर पोलिसांची ड्रग्सविरोधात मोठी कारवाई; 2 जण अटकेत, ८.७६ लाखांचा गांजा जप्त
Pune

पुण्यात बाणेर पोलिसांची ड्रग्सविरोधात मोठी कारवाई; 2 जण अटकेत, ८.७६ लाखांचा गांजा जप्त

Baner Police Drugs Case

Pune Baner Drug Raid : पुण्यात अंमली पदार्थांच्या विरोधात बाणेर पोलीसांनी मोठी कारवाई करत दोन इसमांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ८.७६ लाख रुपयांचा गांजा व साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिलीय.

लाल बॅगेतून ३.०३४ किलो गांजा जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरातील ज्युपिटर हॉस्पिटलजवळ दोन इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सापळा रचण्यात आला. रात्री सुमारे १.३० वाजता, काळ्या रंगाच्या होंडा शाइन मोटारसायकलवरून आलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील लाल बॅगेतून ३.०३४ किलो गांजा जप्त करण्यात आला.

आरोपींची माहिती

अभिषेक भिका बोरसे (वय २४, चिंचवड)
अक्षय भिका बोरसे (वय २९)
यानंतर त्यांच्या राहत्या घरी झडती घेतली असता आणखी १३.०८८ किलो गांजा, इलेक्ट्रॉनिक काटा व इतर साहित्य मिळून ६.५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एकूण जप्ती

१६.१२२ किलो गांजा
मोटारसायकलसह एकूण किंमत: ८,७६,४९० रुपये
या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब), २२(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपींना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ड्रग्सविरोधी मोहिम अधिक तीव्र

सदर कारवाई पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर करीत आहेत. पुण्यात अंमली पदार्थांविरोधातील ही मोठी कारवाई मानली जात असून, शहरात ड्रग्सविरोधी मोहिम अधिक तीव्र करण्याचे संकेत मिळत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts