• Home
  • राजकारण
  • चाकणकरांनी अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली, अंधारेंनी फोटोसह सर्वच सांगितलं
Top News

चाकणकरांनी अमावस्येला स्वत:ची अनामिका कापली, अंधारेंनी फोटोसह सर्वच सांगितलं

Sushma Andhare on Rupali Chakankar

Chakankar Amavasya Finger Cut : आज पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणी (Ashok Kharat) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. म्हणाल्या की, एका पीडितेने सांगितलं की, रुपाली चाकणकर देखील तंत्रमंत्र विद्या करत होत्या. २ सप्टेंबर २०२४ ला रोजी सोमवती अमावस्या होती. त्यादिवशी रुपाली चाकणकरांनी स्वत:च्या हाताची अनामिका (Ring Finger) कापली होती.

हेही वाचा – 

चाकणकरांच्या हाताच्या अनामिकाला बँडेज

अंधारे यांनी केवळ आरोप केले नाहीत तर रुपाली चाकणकर यांचे त्यावेळचे फोटोही माध्यमांसमोर दाखवले. या फोटोमध्ये रुपाली चाकणकरांच्या हाताच्या अनामिकाला बँडेज असल्याचे दिसत आहे. “कॅप्टन खरातची कुंडली काढणाऱ्या पत्रकाराला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी धमकावले होते.

तंत्र-मंत्र, काळी जादू या अंधश्रद्धेला खतपाणी

खबरदार पुढारीचा वृत्तसंपादक होता, त्याला महिला आयोगाने जी पत्रे पाठवली होती. त्याच्यावर चाकणकरांनी दबाव आणला होता, त्याचे पुरावे समोर आले आहेत. हे तंत्र-मंत्र, काळी जादू या अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहे.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पाय धुतात, पदराने पाय पुसत नाहीत तर अक्षरशः लोटांगण घेतात. या तंत्र मंत्र अघोरी विद्येमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा पुढे असतात हे विशेष आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्यात.

खरातांच्या पीएच्या प्रकरणातही सहभाग

चाकणकर बाईंना सर्व गुन्ह्यांची माहिती होती. त्यांनी सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिले होते. रुपाली चाकणकर यांनी खरातांच्या पीएच्या प्रकरणातही सहभाग नोंदवला. या पत्रकार परिषदेंमधून आमची मागणी आहे, चाकणकरांना तातडीने अटक केली पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे.

चाकणकर फरार होण्याआधी त्यांना अटक करा

“समोरासमोर बसवून चौकशी झाली पाहिजे. त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. अशा पद्धतीने तंत्र मंत्र पद्धतीत जर चाकणकर गुंतल्या असतील तर त्यांना त्यांच्या पदावरुन बाजूला केले पाहिजे. रुपाली चाकणकर फरार होण्याआधी त्यांना अटक झाली पाहिजे. मागच्या वर्षभरात त्यांनी अनेक वेळा अनेकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे,” असा आरोप सुषमा अंधारे यानी रुपाली चाकणकर यांच्यावर केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts