Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! कर्जमाफीची रक्कम लवकरच खात्यात; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ
ऍग्रो स्पेशल

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! कर्जमाफीची रक्कम लवकरच खात्यात; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ

Farmer

Maharashtra Farmer Loan Waiver 2026: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, या लाभासाठी ई- केवायसी (e- kyc) पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे. ज्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांनाच या टप्प्यात कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

ई- केवायसी पूर्ण असणे आवश्यक

सरकारने प्रसिद्ध केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीतील शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी ई- केवायसीची (Maharashtra Farmer e- KYC) प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. त्यामुळे अद्याप ई- केवायसी बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: पुणे विमानतळावरून नवीन उड्डाणांना प्राधान्य; देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवांचा विस्तार

पहिल्या टप्प्यात लाखो शेतकऱ्यांना लाभ (Maharashtra Farmer Scheme)

कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली असून, त्यातील पहिल्या हप्त्यात सुमारे ७ हजार कोटी रुपये वितरित करण्याची तयारी करण्यात आली आहे.

निधी वितरणाची प्रक्रिया सुरू

सरकारच्या नियोजनानुसार, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम टप्याटप्याने जमा केली जाणार आहे. या वितरण प्रक्रियेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले जात आहे. निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार असल्याने स्वतंत्र अर्ज किंवा अतिरिक्त प्रक्रिया करण्याची गरज नाही.

अटींमध्ये बदल केल्यानंतर योजनेचा विस्तार

सुरुवातीला कर्जमाफीसाठी काही पात्रता निकषांवर आक्षेप घेण्यात आले होते. विविध स्तरांवरून सूचना आणि मागण्या आल्यानंतर सरकारने काही अटींमध्ये बदल करत योजनेची व्याप्ती वाढवली. त्यानंतर सुधारित निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली.

लाभार्थ्यांनी काय करावे?

पात्र लाभार्थी यादीत नाव आहे का, ते तपासा.
बँक खाते आधारशी लिंक आहे याची खात्री करा.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवा.
अधिकृत माहितीसाठी संबंधित बँक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधा.

FAQ

1. कर्जमाफीची रक्कम कोणाला मिळणार?
पात्र लाभार्थी यादीत नाव असलेल्या आणि ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना.

2. ई-केवायसी अनिवार्य आहे का?
होय. ई-केवायसी पूर्ण नसल्यास रक्कम जमा होण्यास अडथळा येऊ शकतो.

3. स्वतंत्र अर्ज करावा लागेल का?
उपलब्ध माहितीनुसार, पात्र लाभार्थ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

4. रक्कम कशी मिळणार?
थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts