Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ‘मी येतोय…’ पार्थिव पटेलच्या पोस्टने क्रिकेटविश्वात खळबळ; नेमकं काय होणार?
क्रीडा

‘मी येतोय…’ पार्थिव पटेलच्या पोस्टने क्रिकेटविश्वात खळबळ; नेमकं काय होणार?

Parthiv Patel Coming Soon
0
Parthiv Patel Coming Soon: पार्थिव पटेलच्या सोशल मीडिया अकाउंटवरील नव्या ‘Coming Soon’ पोस्टने क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. आता अजित आगरकर यांच्या जागी पार्थिव पटेलची वर्णी लागणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

टीम इंडियाच्या निवड समितीमध्ये लवकरच मोठा बदल होणार असल्याच्या चर्चांना आता आणखी उधाण आलं आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या एका सूचक पोस्टमुळे क्रिकेट वर्तुळात चर्चाना नवा रंग आला आहे. पार्थिवने केवळ ‘‘Coming Soon’ अशी पोस्ट केली असून, त्याने या पोस्टचा नेमका संदर्भ मात्र स्पष्ट केलेला नाही.

हेही वाचा: ‘९० हजारांची फी भरा, नाहीतर कागदपत्रे नाही!’ अहमदनगरच्या कॉलेजविरोधात विद्यार्थ्याचा उपोषणाचा इशारा

पार्थिवाच्या एका पोस्टने चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीमध्ये बदल होण्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेत माजी विकेटकीपर-फलंदाज पार्थिव पटेल याचे नाव आघाडीवर असल्याचे दावे केले जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर पार्थिवची ‘Coming Soon’ पोस्ट समोर आली. पोस्टमध्ये कोणत्याही पदाचा किंवा नियुक्तीचा थेट उल्लेख नसला, तरी सोशल मीडिया यूजर्सनी त्याचा संबंध टीम इंडियाच्या निवड समितीशी जोडण्यास सुरुवात केली आहे.

पार्थिव नेमकं काय जाहीर करणार? त्याच्या पोस्टमागे निवडकर्ता पदाशी संबंधित काही घोषणा आहे का? असे प्रश्न सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये उपस्थित होत आहेत.

आगरकरांच्या जागी पार्थिव?

दरम्यान, सध्याचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या कार्यकाळाबाबतही क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या जागी पुढील मुख्य निवडकर्ता कोण असणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर नव्या मुख्य निवडकर्त्याच्या संभाव्य नावांमध्ये पार्थिव पटेलचे नाव चर्चेत असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र, पार्थिवच्या सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चेला आणखी वेग मिळाला आहे.

सोशल मीडियावर तर्क-वितर्क

पार्थिवच्या पोस्टनंतर सोशल मीडिया यूजर्समध्ये विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. काही जण त्याची पोस्ट टीम इंडियाच्या निवड समितीतील संभाव्य नियुक्तीशी जोडत आहेत, तर काहींच्या मते त्याच्या आगामी प्रोजेक्टची ही घोषणा असू शकते. मात्र, या चर्चांमध्ये सध्या कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

BCCIकडून अद्याप अधिकृत घोषणा नाही

महत्त्वाचं म्हणजे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI किंवा पार्थिव पटेल यांच्याकडून तो टीम इंडियाचा नवा मुख्य निवडकर्ता होणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘Coming Soon’ या एका पोस्टमुळे चर्चांना उधाण आले असले, तरी पार्थिवच्या पोस्टचा नेमका अर्थ काय आहे, हे अधिकृत घोषणा झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. आता पार्थिवची ही पोस्ट नेमकी कोणता मोठा खुलासा घेऊन येते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts