Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • भारत- वेस्ट इंडिज मालिकेसाठी आज संघनिवड; अगरकर यांच्या भविष्यावरही चर्चा होण्याची शक्यता
क्रीडा

भारत- वेस्ट इंडिज मालिकेसाठी आज संघनिवड; अगरकर यांच्या भविष्यावरही चर्चा होण्याची शक्यता

India West Indies Series 2026
3
India West Indies Series 2026: भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघनिवडीची महत्वाची बैठक बुधवारी होणार आहे. या बैठकीत वनडे आणि टी २० मालिकांसाठी भारतीय संघ निश्चित केला जाईल. विशेष म्हणजे, मुख्य निवडकर्ता अजित अगरकर यांच्या कार्यकाळाबाबतही या बैठकीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे.

अजित अगरकर यांनी जुलै २०२३ मध्ये भारताच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्षपद स्वीकारले होते. आता त्यांचा करार संपण्याच्या मार्गावर असल्याने ते मुख्य निवडकर्ता म्हणून पुढेही कायम राहणार की पद सोडणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष (Team Selection 2026) लागले आहे.

संध्याकाळी होणार संघनिवड

भारतीय निवड समितीची बैठक बुधवारी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर होण्याची शक्यता आहे. यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन वनडे आणि पाच टी-20 सामन्यांसाठी संघ निवडला ( India West Indies Series) जाईल. याशिवाय ईशान कपसाठीही खेळाडूंची निवड होण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका 27 सप्टेंबरपासून सुरू होणार असून टी-20 मालिकेला 6 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल.

हेही वाचा: बिस्किट-नमकीनला द्या ब्रेक! चहासोबत खा कुरकुरीत खाखरा-बटाटा चाट; लगेच नोट करा रेसिपी

अगरकर यांच्या पदाबाबत काय होणार?

अजित अगरकर (Ajit Agarkar) यांचा करार पुढे वाढवला जाणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. विशेषतः 2027 मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकापर्यंत ते निवड समितीचे नेतृत्व करणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. (India Team Selection 2026)

अलीकडे झालेल्या बीसीसीआयच्या आढावा बैठकीत अगरकर सहभागी झाले नव्हते. त्यानंतर त्यांच्या पदावरून पायउतार होण्याच्या चर्चांना वेग आला. पीटीआयच्या वृत्तानुसार, वेस्ट इंडिज मालिकेसाठी होणारी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखालील शेवटची बैठक ठरू शकते.

रोहित शर्माबाबत पुन्हा चर्चा?

या संघनिवडीत सर्वाधिक लक्ष रोहित शर्माच्या भवितव्याकडे असेल. इंग्लंड दौऱ्यादरम्यान रोहितच्या वनडे क्रिकेटमधील भवितव्याबाबत चर्चा झाली होती.

निवडकर्त्यांकडून भविष्यातील वनडे योजनांमध्ये रोहितचा समावेश न करण्याचा विचार असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी त्यानंतर रोहित भारताच्या वनडे योजनांचा भाग असल्याचे स्पष्ट केले होते.

विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात रोहितने शानदार शतक झळकावले होते. त्यामुळे आगामी मालिकेसाठी त्याची निवड होते का, याकडे विशेष लक्ष असेल.

वनडे संघनिवडीत आव्हान

टी-20 संघाबाबत फार मोठे बदल होण्याची शक्यता नसली तरी वनडे संघाची निवड निवडकर्त्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघाची भविष्यातील दिशा निश्चित करण्यासाठी प्रत्येक निर्णयाकडे बारकाईने पाहिले जाईल.

आता बुधवारी होणाऱ्या बैठकीनंतरच अगरकर यांच्या पदाबाबत आणि रोहित शर्माच्या वनडे भवितव्याबाबत नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts