Ajinkya Rahane Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रहाणेने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला.
आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट शेअर करत रहाणेने (Ajinkya Rahane) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), संघातील सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि जगभरातील चाहत्यांचे आभार मानले.
भारतीय संघासाठी अनेक संस्मरणीय डाव खेळणाऱ्या रहाणेने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या घोषणेनंतर क्रिकेट चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छा आणि प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.
India batter Ajinkya Rahane has announced his retirement from international cricket and all formats.
He posted on Instagram, “Cap 278 signing off. Thank you for all the love and support over the years. Forever grateful”
(Video: Ajinkya Rahane/Instagram) pic.twitter.com/DRRSDzaHe2
— IANS (@ians_india) July 30, 2026









