Breaking News :
  • Home
  • Mumbai
  • IIT Bombay मध्ये विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ; रात्रभर कॅम्पसमध्ये प्रशासनाविरोधात आंदोलन
गुन्हा

IIT Bombay मध्ये विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ; रात्रभर कॅम्पसमध्ये प्रशासनाविरोधात आंदोलन

IIT Bombay Student Death
59
IIT Bombay Student Death: IIT Bombay मधील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कॉलेज परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात रात्रभर आंदोलन करत चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.

IIT Bombay Student Death: आयआयटी बॉम्बेच्या पवई कॅम्पसमध्ये एका द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर शुक्रवारी रात्री विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलन केले. परीक्षेदरम्यान मोबाईल आणि ChatGPT वापरल्याचे घटना समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा होस्टेलच्या खोलीत मृत्यू झाला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडून सखोल चौकशी आणि पारदर्शकतेचा मागणी केली.

परीक्षेदरम्यान नेमकं काय घडलं?

IIT बॉम्बेच्या (IIT Bombay Protest) ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी परीक्षेला बसला होता. संस्थेच्या माहितीनुसार परीक्षेदरम्यान त्याच्याकडे मोबाईल आढळला आणि त्याने प्रश्नपत्रिका ChatGPT वर अपलोड करून उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा: UPI फ्री ठेवण्यासाठी 20 हजार कोटींचा खर्च, मग सरकार शुल्क का लावतंय? जाणून घ्या संपूर्ण गणित

या घटनेनंतर संबंधित विद्यार्थी, प्रशिक्षक आणि विभागप्रमुख यांच्यात चर्चा झाली. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर कोणतीही औपचारिक शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती. त्याचे समुपदेशन करून या घटनेचा त्याच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर तो हॉस्टेलमध्ये परतला आणि संध्याकाळी त्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळला. (IIT Bombay News)

मृत्यूची बातमी पसरताच कॅम्पसमध्ये संताप

विद्यार्थ्याच्या मृत्यूची माहिती कॅम्पसमध्ये पसरल्यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी मुख्य इमारतीजवळ जमा झाले. आंदोलक विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली. आंदोलनात 400 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाल्याचे वृत्त आहे. (IIT Bombay Campus Protest)

काही विद्यार्थ्यांनी संबंधित घटनेदरम्यान निलंबनाची भीती किंवा दबाव निर्माण झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. IIT बॉम्बेने आपल्या अधिकृत भूमिकेत औपचारिक कारवाई न केल्याचे स्पष्ट केले आहे. (IIT Bombay Latest News)

आंदोलनस्थळी संचालकांची उपस्थिती

विद्यार्थ्यांचे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. परिस्थिती पाहता IIT बॉम्बेचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलनाचे ठिकाण मुख्य इमारतीसमोरील भागातून दीक्षांत सभागृहाकडे हलवण्यात आले. (IIT Bombay Death News)

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मिड-सेमिस्टर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचेही वृत्त आहे. कॅम्पसमध्ये पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, मृत्यूच्या परिस्थितीचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. Mumbai Education News

IIT बॉम्बे प्रशासनाची भूमिका काय?

विद्यार्थ्याच्या निधनाबद्दल IIT बॉम्बेने (IIT Bombay Student Death Case) दुःख व्यक्त केले आहे. मृत्यूच्या परिस्थितीचा संबंधित यंत्रणांकडून तपास केला जात असल्याचे संस्थेने सांगितले. तसेच मृत विद्यार्थ्याचे मित्र, वर्गमित्र, प्राध्यापक आणि इतर प्रभावित व्यक्तींना आवश्यक मदत देण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे या घटनेची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास पुढे गेल्यानंतर विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या नेमक्या परिस्थितीबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts