• Home
  • देश
  • थुंकी पडली दीड लाख रुपयांना; लंडनमध्ये २ भारतीयांना दंड
Top News

थुंकी पडली दीड लाख रुपयांना; लंडनमध्ये २ भारतीयांना दंड

Spitting

Spitting in london Fine: भारतात कुठेही थुंका, त्याला काही होत नाही. परंतु परदेशात थुंकाल (spitting) तर तुम्हाला दंड लागू शकतो. याचा प्रत्येय समोर आला असून लंडनच्या ब्रेंट परिसरात (Brent area of ​​London) सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन रस्त्यावर थुंकणे दोन भारतीयांना महागात पडले आहे. त्यांच्याकडून १,३९१ पाउंड (सुमारे १.४५ लाख रुपये) (Pound) दंड वसूल करण्यात आला आहे.

हे ही वाचा: इंडक्शन खरेदी करत आहात? आधी ‘या’ गोष्टी नीट तपासा नाहीतर पैसे जातील वाया

प्रकरण कोर्टात पोहोचले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही व्यक्तींना पहिल्यांदाच १०० पाउंड दंड भरण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी तो भरला नाही. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले आणि दंड अनेक पटींनी वाढला.

ब्रेंट सिटी कौन्सिलची कठोर मोहीम

ब्रेंट सिटी कौन्सिलने (Brent area of ​​London) पान थुंकण्याविरोधात कठोर मोहीम सुरू केली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, यामुळे सार्वजनिक जागा अस्वच्छ होतात आणि स्वच्छतेवर खूप खर्च वाढतो. रिपोर्टनुसार, कौन्सिलला दरवर्षी सुमारे ३०,०० पाउंड (जवळपास ३० लाख रुपये) फक्त पानाचे डाग साफ करण्यासाठी खर्च करावे लागतात.

वेळेवर दंड न भरल्यामुळे रक्कम वाढली

पहिले प्रकरण एडग्वेअर परिसरात राहणाऱ्या अक्षीतकुमार भद्रे पटेल (akshitkumar patel) यांचे आहे. त्यांनी जून २०२५ मध्ये किंग्सबरी रोडवरील एका मेट्रो स्टेशनजवळ पान थुंकले होते. ते कोर्टात हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतच त्यांच्याविरुद्ध निकाल सुनावण्यात आला. वेळेवर दंड न भरल्यामुळे त्यांची रक्कम १० पटींहून अधिक वाढली.

गैरहजेरीतच निकाल

दुसरे प्रकरण रुईस्लिप परिसरात राहणाऱ्या हितेश पटेल (hitesh patel) यांचे आहे. त्यांनी वेम्बली हिल रोडवर पान थुंकले होते. तेही न्यायालयात हजर झाले नाहीत आणि त्यांच्याविरुद्धही गैरहजेरीतच निकाल लागला, त्यामुळे त्यांनाही मोठा दंड ठोठावण्यात आला.

स्थानिक प्रशासन कठोर

वायव्य लंडनच्या ब्रेंट आणि आसपासच्या परिसरात पान थुंकण्याची समस्या वाढत आहे, ज्यावर स्थानिक प्रशासन कठोर झाले आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, पानाचे डाग काढणे कठीण आणि महागडे असते, यासाठी खास पद्धतीने स्वच्छता करावी लागते.

‘झिरो टॉलरन्स’ धोरण

कौन्सिलने ‘झिरो टॉलरन्स’ (शून्य सहनशीलता) धोरण अवलंबले आहे. या अंतर्गत जागोजागी इशारा देणारे फलक लावले जात आहेत, अधिकारी गस्त घालत आहेत आणि जागेवरच १०० पाउंडपर्यंतचा दंड आकारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts