PV Sindhu And Sonal Chauhan Stranded In Dubai | अमेरिका-इस्त्रायल (America-Israel) या दोन देशांनी मिळून इराणवर (Iran) हल्ला करत युद्ध (War) पेटवलं आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणनेही आक्रमक होत हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. इराणनेही दोन्ही देशांवर हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. इराणने दुबईवर (Dubai) क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तर या युद्धामुळे दुबईतील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. हवाई क्षेत्र बंद करण्यात आल्यामुळे भारतातील अनेकजण दुबईत अडकले आहेत.
हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली थेट धमकी; म्हणाले, आम्ही इतका मोठा हल्ला करणार की तुम्ही…
पुण्यातील 84 विद्यार्थ्यांसह भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान (Sonal Chauhan) या दोघी दुबईमध्ये अडकल्या आहेत. सुरू असलेल्या युद्धामुळे दुबईतील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि अभिनेत्री सोनल चौहान यांना भारतात परत येणे कठीण झाले आहे. याबाबत दोघींनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत युद्धाचा भयानक अनुभव सांगितला आहे. तसेच सोनल चौहानने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) मदतीची मागणी केली आहे.
ही परिस्थिती पाहणं खरोखरंच भयानक झाले आहे…
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, सध्या काय घडत आहे हे समजून घेणं खूप कठीण झालं आहे. युद्धाची ही परिस्थिती पाहणं खरोखरंच भयानक झाले आहे. दुबई हे शहर माझं आवडतं ठिकाण आहे. हे ठिकाण मला नेहमी सुरक्षित वाटते, पण आता हा युद्धाचा क्षण समजणे आणखी कठीण झाले आहे, असं पीव्ही सिंधूने म्हटले आहे.
अभिनेत्री सोनल चौहानने मागितली पंतप्रधान मोदींकडे मदत
तर दुसरीकडे अभिनेत्री सोनल चौहानने इन्स्टाग्रामवर पंतप्रधान मोदींना टॅग करत म्हटले आहे की, आदरणीय पंतप्रधान मोदीजी, सध्या सुरू असलेल्या संकटामध्ये मी दुबईत अडकले आहे. येथील विमाने रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भारतात परतण्यात कोणाताही मार्ग दिसत नाहीये. मला सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी आणि मदतीसाठी मी सरकारकडून पाठिंबा मागत आहे. मी सरकारकडून कोणत्याही मदतीसाठी अत्यंत आभारी राहीन, असे सोनलने म्हटले आहे.
दरम्यान, पीव्ही सिंधू आणि सोनल चौहान या दोघींसह पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील इंदिरा कॉलेजचे विद्यार्थी ‘स्टडी व्हिसिट’साठी दुबईला गेले होते. पण अचानक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने हे विद्यार्थी दुबईमध्ये अडकून पडले आहेत. पण, या विद्यार्थ्यांना परराष्ट्र मंत्रालयाकडून लवकरात लवकरत भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.












