Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मुंबईत मराठी सक्तीच्या मुद्द्यावर चर्चा; रितेश देशमुख नेमकं काय म्हणाले जाणून घ्या!
ताज्या बातम्या

मुंबईत मराठी सक्तीच्या मुद्द्यावर चर्चा; रितेश देशमुख नेमकं काय म्हणाले जाणून घ्या!

Riteish Deshmukh on Ambassador MSRTC: महाराष्ट्रात सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुख यांनी आपलं ठाम मत मांडत मराठीला प्राधान्य देण्याचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच राज्य परिवहन व्यवस्थेसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले असून, त्यामध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची एसटी बसच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या घोषणेनंतर रितेश यांनी आपल्या भावना व्यक्त करत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

रितेश म्हणाले की, त्यांचे वडील, माजी मुख्यमंत्री विकासराव देशमुख यांच्यासोबत त्यांची लहानपणी अनेकदा एसटी बसने प्रवास केला आहे. त्या प्रवासाने त्यांच्या आयुष्यात खास स्थान मिळवलं असून आज त्याच एसटी सेवेशी जोडले जाणं हा अभिमनाचा क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना रितेश यांनी स्पष्ट केलं की महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असणं गरजेचं आहे. त्यांच्या मते, जसं आपण इतर राज्यांमध्ये गेल्यावर तेथील स्थानिक भाषा वापरण्याचा प्रयत्न करतो, तसंच महाराष्ट्रातही मराठीला प्राधान्य मिळायला हवं.

दरम्यान, या निर्णयाविरोधात काही रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी आंदोलन सुरू केलं असलं तरी सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पुढील काळात या मुद्द्यावर काय निर्णय होतो आणि परिस्थिती कशी बदलते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts