• Home
  • राजकारण
  • पक्षहिताला प्राधान्य, कार्यकर्त्यांना संधी; गरज पडल्यास अजितदादांप्रमाणे कडक निर्णय घेणार : सुनेत्रा पवार
Top News

पक्षहिताला प्राधान्य, कार्यकर्त्यांना संधी; गरज पडल्यास अजितदादांप्रमाणे कडक निर्णय घेणार : सुनेत्रा पवार

Sunetra Pawar

Sunetra Pawar Statement: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्षापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी पक्षसंघटन, कार्यकर्त्यांची भूमिका आणि भविष्यातील निर्णयांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना संघटनाबांधणी, पक्षनिष्ठा आणि भविष्यातील वाटचालीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पक्षाच्या उभारणीत कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगत त्यांनी संघटनेला अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा: बॉक्स ऑफिसवर ‘ देऊळ बंद 2’ ची घोडदौड कायम; मराठी सिनेसृष्टीत नाव विक्रम, ‘वेड’ लाही टाकलं मागे

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, पक्षाची जबाबदारी स्वीकारताना समोर असलेल्या आव्हानांची पूर्ण जाणीव होती. राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांच्या निष्ठेची माहिती असल्याचे सांगत योग्य वेळी कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट करताना त्यांनी संघटनेच्या कामकाजात कोणतीही अडचण किंवा हस्तक्षेप आढळल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असेही नमूद केले. गरज पडल्यास कठोर निर्णय घेण्यास मागे हटणार नसल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

शहरी भागात संघटनात्मक काम वाढवण्याची गरज

पुढे बोलताना त्यांनी पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात संघटनात्मक काम वाढवण्याची गरज व्यक्त केली. बूथस्तरावरील कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वानी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा आधारस्तंभ असलयाचे सांगत सुनेत्रा पवार यांनी जनसंपर्क वाढवणे, लोकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचे सांगितले. गाव, वाडी, वस्ती आणि शहरांमध्ये नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी करू संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान, महिला सहभाग वाढवणे आणि नव्या पिढीला पक्षाशी जोडणे यालाही आगामी काळात प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts