Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • दररोज घरी कापूर जाळल्याचे ‘हे’ आहेत ५ महत्त्वाचे फायदे..
ताज्या बातम्या

दररोज घरी कापूर जाळल्याचे ‘हे’ आहेत ५ महत्त्वाचे फायदे..

Benefits of burning camphor at home : अनेकांच्या घरात सकाळची सुरुवात देव देवतांच्या नामस्मरणाने केली जाते. पूजा-आरच्या केली जाते आरतीने केली जाते. प्रत्येकाच्या घरात पूजा करण्याची पद्धत नक्कीच वेगळी असते. मात्र, पुजा करताना वापरण्यात येणार्‍या वस्तू मात्र शक्यतो सारख्याच असतात. जसं की, फुले, अगरबत्ती, हळद-कुंकू धूप-दीप किंवा कापूर इत्यादी. आरती करताना कापूर जाळणे शुभ मानले जाते. घरात कापूर जाळण्याचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही ५ महत्त्वाचे फायद्यांविषयी आज आपण माहिती घेऊ..

जाळण्याचे फायदे –

आरती करताना कापूर लावणे किंवा देवाजवळ कापूर जाळणे महत्त्वाची नाही. घरातच कापूर जाळण्याचे अनेक फायदे आहेत. घरात कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा लवकर नष्ट होते.

वास्तु दोष दूर होतात

जर तुम्ही तुमच्या घरात दररोज कापूरची ज्योत पेटवायला सुरुवात केली तर हळूहळू वास्तुदोष दूर होतील. हे वास्तुदोष दूर होताच घरात शांती आणि आनंद टिकून राहते. सौभाग्यासाठी देखील महत्त्वाचे असते. म्हणून, दररोज कापूर जाळणे अत्यंत महत्वाचे आहे.

हेही वाचा – तुम्हालाही झोप येत नाही, मग ट्राय करा मिलिटरी स्लीप पद्धत दोन मिनिटांच्या आत येईल झोप

घरात सकारात्मक ऊर्जा येते

प्रार्थना आणि धार्मिक विधींमध्ये दररोज कापूर जाळणे आणि आरती करणे तुमचे मन शांत आणि सकारात्मक ठेवेल. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा देखील येईल. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात वाढ होईल आणि इतर सकारात्मक बदल घडून येतील.

आर्थिक समृद्धीमध्ये वाढ

कापूरामध्ये एक शक्तिशाली ऊर्जा असते. त्याच्या सुगंधाने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ही ऊर्जा पसरते. ते दररोज जाळल्याने आर्थिक अडचणी कमी होतात आणि संपत्ती वाढते.

वाईट नजरेपासून बचाव करते

वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी कापूर हा सर्वात प्रभावी उपाय आहे. मिश्रणात लवंग घातल्याने त्याची ऊर्जा आणखी वाढते, जी वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक मानली जाते. नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी, तसेच घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी दररोज कापूर जाळला तर नक्कीच सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.

ग्रहांचे वाईट परिणाम संपतात (Benefits of burning camphor at home)

ग्रहांच्या प्रभावामुळे ग्रस्त असलेले लोक कापूर जाळून त्यांच्या अडचणी लक्षणीयरीत्या कमी करू शकतात. ग्रहांच्या प्रभावामुळे जीवनातील अनेक कामे बिघडू शकतात. अशा परिस्थितीत, इतर उपायांसह घरात दररोज कापूर जाळल्याने परिस्थिती सुधारण्यास मदत होतो

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts