Chia Mango Smoothie Recipe: फक्त काही मिनिटांत तयार होणारी ही चिया- मँगो स्मूदी उन्हाळ्यासाठी एक परफेक्ट, थंडावा देणारी आणि पौष्टिक निवड आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या स्नॅकसाठी तुम्ही ही नक्की ट्राय करू शकता.
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे आणि पौष्टिक नाश्त्याचे पर्याय खूप महत्वाचे ठरतात. रोजचे पारंपरिक नाश्ते जसे की पोहे, उपमा किंवा शिरा यांचा कंटाळा आला असेल, तर काहीतरी नवीन आणि हेल्दी ट्राय करणे उत्तम ठरते. अशावेळी चिया० मँगो स्मूदी एक परफेक्ट पर्याय आहे, जी चविष्ट तर आहेच पण आरोग्यसाठीही फायदेशीर आहे.
हेही वाचा: एप्रिलच्या ‘या’ तारखांना राहणार बँका बंद; पाहा सुट्ट्यांची यादी
चिया- मँगो स्मूदी का खास आहे?
आंब्याचा गोडवा आणि चिया सीड्सचे पोषणमूल्य एकत्र आल्याने ही स्मूदी शरीराला ऊर्जा देते, पचन सुधारते आणि दिवसभर पोट भरल्यासारखे ठेवते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठीही ही स्मूदी उपयुक्त आहे.
साहित्य
पिकलेला आंबा
दूध
मध
चिया सीड्स
सुका मेवा (बदाम, काजू इ.)
बर्फाचे तुकडे
कृती
सर्वप्रथम १ चमचा चिया सीड्स एका वाटीत घेऊन त्यात दूध घालून १५–२० मिनिटे भिजत ठेवा.
पिकलेला आंबा स्वच्छ धुऊन सोलून त्याचे छोटे तुकडे करा.
मिक्सरमध्ये आंब्याचे तुकडे, दूध, मध आणि थोडा सुका मेवा घालून मऊसर मिश्रण तयार करा.
ग्लासमध्ये आधी भिजवलेले चिया सीड्स घाला, त्यावर बर्फाचे तुकडे टाका.
त्यावर तयार केलेली आंब्याची स्मूदी ओता आणि वरून थोडे चिया सीड्स व सुका मेवा घालून सजवा.




