Breaking News :
  • Home
  • फूड
  • डाळिंब, कीवी, लसूण सोलताना कंटाळा येतो? मग वापरा हे 5 भन्नाट किचन हॅक्स; मिनिटांत होईल काम
लाईफस्टाईल

डाळिंब, कीवी, लसूण सोलताना कंटाळा येतो? मग वापरा हे 5 भन्नाट किचन हॅक्स; मिनिटांत होईल काम

Easy Kitchen Hacks
44
Easy Kitchen Hacks: तुम्हालाही डाळिंब आणि लसूण सोलताना खूप कंटाळा येत असेल, तर हे पाच भन्नाट किचन हॅक्स नक्की वापरा. तुमचं काम अवघ्या काही मिनिटांत होईल.

स्वयंपाकघरात पदार्थ बनवण्यापेक्षा अनेकांना त्याची पूर्वतयारी करणे अधिक वेळखाऊ ठरते. लसणाच्या पाकळ्या एकेक करून सोलणे, डाळिंबातून दाणे वेगळे करताना हात आणि किचन खराब होणे, भाजलेल्या शेंगदाण्यांची साल काढणे किंवा किवीची गर न वाया घालवता त्याची साल काढणे ही कामं रोजच्या स्वयंपाकात छोट्या वाटल्या तरी बराच वेळ घेतात. विशेषतः मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करताना या कामांचा अतिरिक्त ताण जाणवतो.

मात्र स्वयंपाकघरातील काही साध्या युक्त्या माहीत असतील, तर हीच वेळखाऊ कामं सहज आणि कमी वेळात करता येतात. यासाठी महागडी उपकरणे किंवा विशेष साहित्याची गरज नसून, घरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंचाच वापर करता येतो.

हेही वाचा: ‘परवानगी द्या किंवा नका देऊ… कार्यक्रम होणारच’; जगतापांच्या भूमिकेनंतर राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला मंजुरी

लसूण, डाळिंब, शेंगदाणे, कीवी आणि अळू यांसारख्या पदार्थांची साल किंवा बाहेरील आवरण काढताना कोणत्या छोट्या ट्रिक्स वापरता येतील, हे जाणून घेऊया. या पाच सोप्या किचन हॅक्समुळे (easy kitchen hacks) तुमचा वेळ वाचण्यासोबतच स्वयंपाकघरातील कामही अधिक सोपे होऊ शकते.

डाळिंब काही मिनिटांत कसे सोलावे? (how to peel pomegranate)

डाळिंब सोलताना हातात दाणे काढण्याऐवजी त्याचे वरचे झाकणासारखे टोक कापून घ्या. त्यानंतर सालीवर उभे असे काही कट द्या आणि डाळिंबाचे भाग हलकेच उघडा.

एका मोठ्या भांड्यात डाळिंबाचे तुकडे धरून चमच्याने सालीवर हलकेच टकटक करा. दाणे खाली पडत जातील आणि सालीचा कचरा वेगळा करणेही सोपे होईल.

लसणाच्या पाकळ्या सोलताना वेळ वाचवा (how to peel garlic)

लसूण सोलण्यासाठी प्रत्येक पाकळी वेगवेगळी सोलण्याऐवजी त्या आधी थोड्या वेळासाठी कोमट पाण्यात ठेवा. यामुळे बाहेरील साल मऊ होण्यास मदत होते.

यानंतर पाकळीवर चाकूची सपाट बाजू ठेवून अगदी हलका दाब द्या. साल सहज सुटेल. कमी प्रमाणात लसूण असेल तर ही पद्धत विशेषतः सोयीची ठरते.

भाजलेल्या शेंगदाण्यांची साल काही वेळात काढा

भाजलेले शेंगदाणे (peanut) मोठ्या प्रमाणात असतील तर प्रत्येक दाणा हाताने सोलण्याची गरज नाही. शेंगदाणे स्वच्छ सुती कापडात किंवा किचन टॉवेलमध्ये घ्या.

कापडाची पोटली करून ती हाताने काही वेळ चोळा. घर्षणामुळे शेंगदाण्यांची लालसर साल सुटण्यास मदत होईल. त्यानंतर शेंगदाणे वेगळे करून उरलेली साल फुंकून किंवा हाताने काढता येईल.

अळूची भाजी सोलताना ही ट्रिक वापरा

अळू कच्चा सोलताना हाताला खाज येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याची साल काढताना काळजी घेणे गरजेचे आहे.

यासाठी स्वच्छ आणि मोठी प्लास्टिकची पिशवी घ्या. त्यामध्ये अळू ठेवून काही वेळ चांगला घासून घ्या. त्यामुळे बाहेरील साल सहज सुटण्यास मदत होते. त्यानंतर अळू पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

कीवी सोलण्याची झटपट ट्रिक (how to peel kiwi)

कीवी हे चविष्ट आणि आरोग्यासाठी उपयुक्त फळ आहे. मात्र त्याच्या सालीवर बारीक केस असल्याने ते सोलताना हातांना रस लागतो.

यासाठी कीवीचे आधी दोन भाग करा. त्यानंतर सालीच्या कडेला चमचा अलगद घाला आणि तो आतून गोल फिरवा. अशा प्रकारे कीवीचा गर सालीपासून सहज वेगळा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts