Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • उन्हाळ्यात थकवा आणि डिहायड्रेशन जाणवत आहे? हे शीतपेय नक्की प्या, शरीर राहील निरोगी
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात थकवा आणि डिहायड्रेशन जाणवत आहे? हे शीतपेय नक्की प्या, शरीर राहील निरोगी

Summer Drinks | सध्या कडक उन्हाळ्याचे (Summer) दिवस सुरू आहेत. त्यामुळे वाढत्या उष्णतेमुळे शरीरात थकवा, घाम, डीहायड्रेशन, डोकेदुखी, चक्कर, उष्माघाताचा धोका अशा अनेक समस्याचा सामना लोकांना करावा लागतो. तसेच जास्त उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता होणे म्हणजेच डिहायड्रेशन होणे, ही सामान्य समस्या बनली आहे. डिहायड्रेशनमुळे थकवा, अंग दुखणे, डोकेदुखी आणि चक्कर येणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. मग या उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आणि हायड्रेशन राखण्यासाठी काही घरगुती शीतपेयांचा वापर खूप फायदेशीर ठरतो.तर आता आपण काही प्रभावी घरगुती शीतपेय आणि त्यांच्या फायद्यांबाबत जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – गुढी उभारताना ‘या’ चुका अजिबात करू नका; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

डिहायड्रेशन होतंय तर घरगुती शीतपेय नक्की ट्राय करा

1. ताक – उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी ताक पिणे खूप फायदेशीर ठरते. दह्यात थोडं पाणी टाकून त्यात मीठ, जिरेपूड टाकून ताक घरी तयार करा. हे ताक पिल्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते आणि पचन सुधारते.

2. नारळ पाणी – डिहायड्रेशनचा त्रास होत असेल तर नारळ पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. नारळ पाणी पिल्यामुळे शरीर लगेच हायड्रेट होण्यास मदत होते आणि शरीर थंडही राहते.

3. लिंबू पाणी – उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे खूप गरजेचे असते. एक ग्लास पाणी घ्या त्यात लिंबाचा रस, थोडी साखर आणि मीठ घाला आणि लिंबू सरबत बनवा. लिंबू सरबत पिल्यामुळे शरीर लगेच हायड्रेट होते आणि शरीराला व्हिटॅमिन सी मिळण्यास मदत होते.

4. कोकम सरबत – उन्हाळ्यात बरेच लोक कोकम सरबत खूप आवडीने पितात. कोकम सरबत पिल्यामुळे शरीर थंड राहते, अॅसिडीटी दूर होते आणि शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. त्यामुळे कोकम भिजवून त्यात साखर, मीठ आणि जिरे पूड घालून कोकम सरबत बनवा आणि तो प्या.

5. जलजीरा – उन्हाळ्यात जलजीरा पिणे खूप फायदेशीर ठरते. जलजीरा बनवण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात जिरे पूड, पुदीना, लिंबाचा रस आणि थोडं मीठ घाला. तयार झालेलं जलजीरा जेवण झाल्यानंतर प्या यामुळे पचन होण्यास मदत होते आणि डिहायड्रेशनचा धोका कमी होतो.

अशाप्रकारे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे वरील घरगुती शीतपेयांचा नियमित वापर करून तुम्ही थकवा, डिहायड्रेशन आणि उष्णतेच्या इतर त्रासांपासून स्वत:चा बचाव करू शकता. या उन्हाळ्यात पाणी, नारळ पाणी, लिंबू-पाणी, ताक अशी नैसर्गिक आणि घरगुती शीतपेयं प्या, जे शरीराला थंड ठेवतील आणि ऊर्जा देईल. तर अशाप्रकारे सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही उन्हाळा आरामात आणि निरोगीपणे घालवू शकता.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts