Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • IKEA चा मराठमोळा अंदाज! स्टोअरमध्ये झळकवल्या पुणेरी पाट्या; सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव
Pune

IKEA चा मराठमोळा अंदाज! स्टोअरमध्ये झळकवल्या पुणेरी पाट्या; सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

ikea
94

IKEA Pune News | पुणे (Pune) शहर आणि पुणेकरांनी त्यांची संस्कृती खूप चांगल्या पद्धतीने जपली आहे. त्यामुळे पुणेकरांची शान काही वेगळीच आहे. पुणेकरांची मिसळ असो पुणेकरांचा गणपती असो किंवा पुणेरी पाट्या असो पुणेकरांनी जपलेल्या या संस्कृतीचं संपूर्ण जगभरात कौतुक होताना दिसत असतं. त्यामुळे पुणेकरांचा थाटच काही वेगळा आहे. पुणेकरांच्या पाट्या या तर जगप्रसिद्ध आहेत. तर आता याच खास पुणेरी पाट्या स्वीडिश फर्निचर कंपनी ‘IKEA’ने आपल्या स्टोअरमध्ये लावल्या आहेत. पुणेरी पाटी लावत IKEA ने पुणेकरांच्या हृदयात स्थान मिळवले आहे.

हेही वाचा – धक्कादायक! पारनेरमध्ये कीर्तनकाराकडून अल्पवयीन मुलीवर अमानुष छळ करत अत्याचार, कीर्तनकाराचं घृणास्पद कृत्य उघडकीस

पुणेकरांच्या स्वागतासाठी IKEA ची भन्नाट आयडीया

नुकतंच पुण्यात नवीन IKEA स्टोअर झाले आहे. या स्टोअरमध्ये पुणेकरांचं स्वागत करण्यासाठी IKEA ने आपल्या स्टोअरमध्ये पुणेरी पाट्या लावल्या आहेत. या पाट्यांवरती अस्सल पुणेरी टोमणे देखील लिहिण्यात आले आहेत जे पुणेकरांच्या चांगलेच पसंतीस पडले आहेत.

IKEA ने पुणेरी पाट्यांवरती नेमकं काय लिहिलं आहे?

IKEA ने पुणेकरांची दुपारची झोप, पुण्यातील ट्रॅफिक, Z ब्रिज अशा मुख्य विषयांवर हात घालत खास पुणेरी पाट्या आपल्या स्टोअरमध्ये लावल्या आहेत. यामध्ये ‘आमच्याकडे 1 ते 4 झोपण्यासाठी पलंग आहेत. उशिरा उठलात तर आम्ही जबाबदार नाही’, ‘खुर्ची बसायला आहे कपड्यांसाठी नाही’, ‘Z-ब्रिजवर बसून फ्यूचर प्लॅन करण्यापेक्षा, IEKA मध्ये येऊन फ्यूचर होम सजवायला घ्या’, ‘पुणे तिथे काय उणे? मिसळ, मस्तानी आणि MALM पण आहे!’, अशा खास पुणेरी स्वॅग मध्ये पुणेरी पाट्या IKEA स्टोअरमध्ये लावण्यात आल्या आहेत. ज्यामुळे IKEA ने पुणेकरांची मने जिंकली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by IKEA India (@ikea.india)

IKEA ने पुणेकरांची संस्कृती जपत त्यांच्या कंपनीची जाहिरातबाजी केली असल्यामुळे त्यांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. IKEA ही एक जागतिक ब्रँड असून या कंपनीने पुणेकरांची मराठी संस्कृती जपल्यामुळे त्यांनी पुणेकरांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. IKEA ने ग्राहकांना आपल्या जवळ करण्यासाठी ही भन्नाट कल्पना लढवली आहे.

सध्या IKEA च्या पुणेरी पाट्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. IKEA च्या पुणेरी पाट्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून पुणेकर IKEA स्टोअरला मोठ्या प्रमाणात भेट देताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या या आनोख्या जाहीरातबाजीचं कौतुक देखील पुणेकरांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts